आता येणार मजा! इम्रान हाश्मीच्या ‘ग्राउंड झीरो’त मराठी स्टार अभिनेत्रीची एण्ट्री, दिग्दर्शकही मराठीच

मुंबई- बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी त्याच्या आगामी सिनेमांच्या विषय निवडीमुळे सध्या चर्चेत आहेत. इम्रान सध्या काश्मीरमध्ये त्याचा नवीन चित्रपट ‘ग्राउंड झिरो’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहेत. सिनेमात इम्रान लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, समोर आलेल्या बातम्यांनुसार, इम्रानच्या या सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे.

ताज्या बातम्यांनुसार, सई ताम्हणकर इम्रानच्या मिलिटरी ड्रामामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, झोया हुसैनदेखील सिनेमाचा मुख्य भाग असेल. सिनेमात सई आणि इम्रान रोमान्स करताना दिसणार आहेत. या फ्रेश जोडीबद्दल बोलताना, ई- टाइम्सच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली की, ‘सई चित्रपटात इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. दोन्ही स्टार्सची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’


चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूने नुकतेच श्रीनगरमधून त्यांचं चित्रीकरण संपवलं असून पहलगाममध्ये शूटिंग सुरू केले आहे. ‘मिमी’मधील सईच्या अभिनयासाठी तिचं भरभरून कौतुक झालं. फक्त कौतुकच नाही तर अनेक पुरस्कारांवर अभिनेत्रीने आपलं नाव कोरलं. लवकरच ती मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’मध्येही दिसणार आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त, सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या सईने अलीकडेच आपल्या ‘फक्त महिला साथी’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली.


इम्रानबद्दल सांगायचे तर, ‘ग्राउंड झिरो’ व्यतिरिक्त त्याच्याकडे सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ देखील आहे. हा चित्रपट मनिष शर्मा दिग्दर्शित करत असून पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous भारतीय क्रिकेटपटूंचा पगार काहीच नाही; पाहा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना किती पगार मिळतो

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …