Breaking News

चकणी असल्याचं सांगून चित्रपटातून काढलं;सई ताम्हणकरने स्वतःच सांगितला तो किस्सा

मुंबई, 11 सप्टेंबर : मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईनं वैविध्यपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशीही नेहमीच कनेक्टेड असलेली पहायला मिळते. अशातच सईनं झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बस बाई बस’ मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सईनं तिला एका चित्रपटातून काढल्याचा भावनिक किस्साही शेअर केला.

‘बस बाई बस’ कार्यक्रमात सईने सांगितलं की, ‘एका चित्रपटासाठी माझं सिलेक्शन झालं होतं. मात्र शूटच्या एक दिवस आधी मला सांगितलं की तू आता हा चित्रपट करत नाहीयेस. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. माझं हर्ट ब्रोकन झालं होतं. माझं कॉन्फिडन्स लो झाला होता. पण मला वाटतं जेव्हा असं काही होतं तेव्हाच माणून पेटून उभा राहतो आणि त्यातून काहीतरी छान घटतं’. यावर सुबोध भावे विचारतात की, काय कारण दिलं होतं त्यांनी. सई म्हणते की, ‘तू चकणी आहेस’.

ही आठवण सांगताना सई थोडी भावनिक झाल्याचीही दिसून आली. सईचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंटही भरभरुन येत आहेत.

हेही वाचा –  ‘हे लई अवघड आहे’; पाहा नेमकं कशाविषयी बोलतोय Amey Wagh

दरम्यान, झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous सट्टेबाजीमुळे भारतीय संघ आशिया चषकातून बाहेर पडला का? सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटने खळबळ
Next मेगा फायनलसाठी दुबई सज्ज; पाकिस्ताननं जिंकला टॉस, श्रीलंकेला दिली बॅटिंग

Check Also

पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबतच्या व्हिडीओवर Urvashi Rautelaने दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 11 सप्टेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपांसून अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेत आहे. अशातच उर्वशी रौतेला पाकिस्तानचा …

सलमान खान गँगस्टरच्या निशाण्यावर, मुसेवालाच्या शूटरकडून धक्कादायक खुलासे

मुंबई: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर अभिनेता सलमान खान सतत चर्चेत आहे. त्याच्या जीवाला …