मालिका आणि त्यात घडवून आणलेली कारस्थानं हे समीकरण तर आता सर्वश्रुत आहेच. या कारस्थानांमध्ये मुख्य नायक-नायिकेसह इतरही व्यक्तिरेखांना आणलं जातंय. कट-कारस्थानांच्या खेळात आता काही मालिकांमध्ये भुतं, आत्मा यांनाही महत्त्वाचं स्थान दिलं जातंय. अशी एक मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवा गडी नवं राज्य असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेची कथा काहीशी वेगळी असली तरी, प्रेक्षकांना मात्र काही केल्या पटत नाहीय. त्यामुळं मालिकेवर सुरुवातीपासूनच टीका होताना दिसतेय.
अनिता दाते म्हणजेच रमा आता या जगात नाही. घरामध्ये तिच्या फोटोची मोठी फ्रेम आहे. या फ्रेममधून ती तिच्या नवऱ्याच्या आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या संसारात ढवळाढवळ करताना दिसते. रमाचा मृत्यू झाला असला तरी ती राधवच्या दुसऱ्या पत्नीला म्हणजेच आनंदीला दिसते. या दोघींमध्ये सुरू असलेल्या चढाओढी, गंमतीजमती या मालिकेत पाहायला मिळातात. परंतु नुकताच एक भाग प्रदर्शित झाला, त्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये आनंदीचा लग्नानंतर पहिला ओवसा असतो, असा प्रसंग दाखवण्यात आलाय. गणपती विशेष भागात आनंदी रमाचा ओवसा भरतेय असाही भाग दाखवण्यात आला होता. त्यानंतर एका भागात आनंदी रामरक्षा म्हटल्यानंतर रमा घाबरते आणि पळून जाते असं दाखवण्यात आलंय. हे पाहून प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी मालिकेवर टीका करत ट्रोल केलं आहे.
हे पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘रमाचं भूत सुहासिनीचा ओवसा घेतं. त्यानंतर गणपतीच्या दर्शनाला येतं, पण रामरक्षा ऐकल्यावर भूत का घाबरतं? याचं लॉजिक लेखकानं सांगावं, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. प्रेक्षकांना इतकंही वेड्यात काढू नका, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या उमटल्या आहेत.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या