आजही कमावला प्रत्येक पैसा बायकोच्या हातात का देतात मामूट्टी
सोशल मीडियावरील कलाकारांचे असे फोटो व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. त्यात गणेशोत्सव असेल तर कलाकारांच्या सेलिब्रेशनला उधाण येतं. चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या कलाकारांनी सण उत्सव कसे साजरे केले हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. म्हणूनच साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आणि आता बॉलिवूड प्रेमींनाही वेड लावलेल्या अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच वेडं करेल.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी देशभरात साजरा केला जात आहे. या गणेशोत्सवाची आणि मिरवणुकीतील गणपती डान्सची भुरळ अभिनेता अल्लू अर्जुनलाही पडली. मग काय, त्याने घरी दणक्यात मोरयाच्या गजरात गणेशोत्सव साजरा केलाच, यासोबतच गणपती विसर्जन मिरवणुकीत मुलगी अरहाला कडेवर घेऊन ढोलताशाच्या निनादावर ठेकाही धरला. अल्लूने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अल्लू त्याच्या ५ वर्षांच्या अरहासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत त्याने गणपती बाप्पा मोरया अशी कॅप्शनही लिहिली आहे.
सुपरस्टारकडे आहेत ३६९ गाड्या, एकदा चालवली तर पुढच्यावर्षी येतो गाडीचा नंबर
अल्लू आणि स्नेहा रेड्डी यांनी २०११ ला लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. मुलगा अयान आणि मुलगी अरहा अशी त्यांची नावं आहे. गेल्याच आठवड्यात अल्लूची पत्नी स्नेहा हिने गणेशोत्सव तयारीचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोंनाही अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी खूप कमेंट केल्या होत्या.
दरम्यान, अल्लूचा ‘पुष्पा .. द रूल’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पुष्पा द राइज सिनेमाला खूप यश मिळाले. त्यामुळे आता पुष्पा २ सिनेमाकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या अखेरीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन न्यूयॉर्कला गेला होता. परेडमध्ये ग्रैंड मार्शल म्ह्णून त्याला निमंत्रित केलं होतं. त्या न्यूयॉर्क भेटीमध्ये एका नव्या हॉलिवूडपटातील भूमिकेबाबतही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अल्लू लवकरच एका हॉलिवूडपटात सुपरहिरोच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या