Ponniyan Selvan Trailer: ऐश्वर्या राय आणि विक्रम यांचा ‘पोन्नियन सेल्वन’ चा तुफान ट्रेलर रिलीज

मुंबई- ऐश्वर्या रायचे चाहते ती कधी एकदा सिनेमात दिसणार याकडे डोळे लावून बसले होते. आणि ऐश्वर्याने त्यांना अशी काही ट्रीट दिली आहे की विचारता सोय नाही. पोन्नियन सेल्वन १ या सिनेमातील ऐश्वर्याचा राणी नंदिनीचा लुक बघून तिचे चाहते घायाळ झालेच होते. आता पोन्नियन सेल्वनचा ट्रेलर बघून प्रेक्षकांची झोप उडाली नाही तरच नवल असा छप्परफाड ट्रेलर रिलीज झाला आहे. मणिरत्नमचा सिनेमा म्हणजे काहीतरी वेगळं असणार यात काही शंकाच नसते. ऐश्वर्यासोबत या सिनेमात विक्रमही आहे. ३ मिनिट १३ सेकंदाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुरळा उडवला आहे.

ब्रेस्ट-ओठ छोटे आहेत…अभिनेत्रीला हे कारण देत सिनेमातून दाखवलेला बाहेरचा रस्ता

पोन्नियन सेल्वन हा एक ऐतिहासिक ड्रामा आहे हे एव्हाना लक्षात आलंच असेल. टीझरमध्ये ऐश्वर्याच्या लुकची खूप चर्चा झाली होती, आता ट्रेलरमध्ये सिनेमातील ग्राफीकने डोळे दीपले आहेत. युद्धाचे सीन पाहताना प्रेक्षकांची झोप उडेल हे ट्रेलरवरूनच दिसत आहे. आदित्य आणि राणी नंदिनी यांच्या प्रेमकथेवरून सिनेमा सुरू होतो हे ट्रेलरमध्ये दिसतं. नंदिनीच्या प्रेमासाठी आदित्य कसा लढा देतो याची झलक ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल.

पाच भाषांमध्ये हा सिनेमा ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. दोन भागात सिनेमा बनणार आहे. पुस्तकावर आधारीत असलेल्या या सिनेमाला घोषणेपासूनच प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण भारतात दीर्घकाळ राज्य करणाऱ्या चोल साम्राज्याची ही कथा आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा ट्रेलरदेखील पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. पोन्नियन सेल्वनच्या हिंदी भाषेतील ट्रेलरला अभिनेता अनिल कपूर याने आवाज दिला आहे.

अनिरुद्धला लालबागच्या राजाच्या दर्शनाचं आमंत्रण, अभिनेत्यानं शेअर केला Video

रजनीकांत यांच्या पाया पडली ऐश्वर्या

पोन्नियन सेल्वन सिनेमात जयराम रवी, सरथकुमार प्रभु, कार्ति आणि ऐश्वर्यालक्ष्मी हे साउथचे कलाकार आहेत. मणिरत्नम यांच्यासोबत ऐश्वर्याने यापूर्वी गुरू, रावण, आणि इरूवर हे सिनेमे केले आहेत, आता हा तिचा त्यांच्यासोबतचा चौथा सिनेमा आहे. या सिनेमाचं शूट सुरू झालं तेव्हा ऐश्वर्याने थलायवा रजनीकांत यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले होते. मणिरत्नम यांना तर ती गुरुस्थानी मानते.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मीडियावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली ‘माझ्यावर कमेंट करण्याआधी तुमच्या आईवर…’

मुंबई, 7 सप्टेंबर-  उर्फी जावेद म्हटलं तरी पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे तिची अंतरंगी …

कुणासोबत घडू नये असं कृत्य! तो ८ वर्षांचा असताना काकानेच केला रेप; अंगावर हॉट वॅक्सही ओतलं

मुंबई: बिग बॉस फेम डिझायनर रोहित वर्माने (Rohit Verma) अलीकडेच त्याच्या बालपणातील कटू आठवणींबाबत सांगितले. …