याविषयी बोलताना रोहित म्हणाला की, ‘मी एका चांगल्या कुटुंबातील आहे. पण माझ्या घरचे काहीसे जुन्या विचारांचे आहेत. जरी माझा चांगल्या कुटुंबात जन्म झाला असला तरी, माझ्या सख्ख्या काकाकडून माझा लैंगिक छळ झाला. मी ८ वर्षांचा असताना माझ्या सख्ख्या काकानेच माझ्यावर बलात्कार केला होता.’
हे वाचा-ब्रेस्ट-ओठ छोटे आहेत…अभिनेत्रीला हे कारण देत सिनेमातून दाखवलेला बाहेरचा रस्ता
रोहित पुढे म्हणाला की, ‘तो मला साडी नेसायला लावायचा, माझ्या शरीरावर हॉट वॅक्स ओतायचा आणि भयंकर कृत्य करायचा. हे सर्व तीन-चार वर्ष सुरू होते. भीतीपोटी मी माझ्या आई-वडिलांना याबद्दल कधीच सांगितले नाही.’
रोहितने यावेळी बोलताना त्या दिवसांचीही आठवण काढली जेव्हा तो एक वैश्या म्हणून काम करत असे. त्या दिवसात तो साडी नेसायचा. रोहितच्या मते त्याला त्या दिवसांबाबत कोणताही पश्चाताप होत नाही, कारण त्याला त्यावेळी पैशांची गरज होती. रोहितने तो एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता, असंही सांगितलं. मात्र त्या अभिनेत्याला काम मिळायला सुरुवात होताच तो सोडून गेल्याचं रोहित सांगतो.
हे वाचा-महाकालचे दर्शन न घेताच परतले आलिया-रणबीर; अभिनेत्याचं ‘बीफ प्रेम’ भोवलं
रोहित अलीकडेच इन्स्टाग्रामवर त्याची जवळची मैत्रीण निशा रावल हिला अनफॉलो केल्याबद्दल चर्चेत होता. तिच्या वैवाहिक आयुष्यातील संकटात तो तिला खूप पाठिंबा देत होता, पण आता दावा केला जातो आहे की ते आता मित्र नाहीत. त्यांच्यात काय बिनसलं हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण रोहितने एका मुलाखतीत इशारा दिला होता की, ‘सर्व काही अगदी खुले आहे. मी एक आधुनिक व्यक्ती आहे. मी एखाद्याबद्दल एखाद्याच्या मनात भावना निर्माण होण्याच्या विरोधात नाही. पण एखाद्याने त्याचा सीमा विसरू नये.’
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या