ऐश्वर्या राय बच्चन सहज बोलून गेली- करण जोहरमुळेच आलिया पुढे आली, आता व्हिडिओ झाला Viral

मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) ही उत्तम अभिनेत्री आहे. राझी सिनेमापासून ते गंगूबाई काठियावाडी सिनेमापर्यंत तिनं दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली. असं असलं तरी आलियाला सिनेसृष्टीत आल्यानंतर इतर संघर्ष करावा लागला नाही. तिच्या काळात आलेल्या इतर कलाकारांच्या तुलनेत तिचा हा प्रवास अतिशय सोपा होता. तिला मोठ्या बॅनरच्या सिनेमाच्या ऑफर सहज मिळाल्या.

भार्गवी चिरमुलेचा नवीन लुक पाहिलात का? अभिनेत्रीच्या नव्या अंदाजाची होतेय चर्चा

आलियाच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याचा तिला पाठिंबा मिळाला. त्यानंच आलियाला पदार्पणाची संधी दिली. आलियाला सहजपणं मिळत गेलेल्या संधीवर ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिनं आपलं मत व्यक्त केलं होतं.

ऐश्वर्याचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) तिच्या फन्ने खान सिनेमाचं प्रमोशन करत असताना एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलिया भट्टबद्दल मोठं विधान केलं होतं. या मुलाखतीमध्ये ऐश्वर्यानं आलियाच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं. परंतु त्याबरोबर हेदेखील सांगितलं की, करण जोहरचा तिला कायम पाठिंबा आहे. त्यामुळे तिच्याकडे मोठ्या सिनेमाच्या ऑफर चालून येतात. ऐश्वर्याच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.


आलिया काम चांगलं करते पण…

ऐश्वर्यानं या मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘आलिया खूप चांगला अभिनय करते. ते पाहते ती खूप पुढं जाईल. आलिया तिचं काम करताना त्यात समरसून जाते आणि त्याचा आनंद घेते स्वतःला शोधत असते. ती खूप चांगला अभिनय करते.तिला मी हे देखील सांगितलं की करण जोहरनं जो पाठिंबा तुला दिला ते तुझ्यासाठी खूपच चांगलं आहे. सुरुवातीपासून त्याचा पाठिंबा तुला मिळाला आहे. असा पाठिंबा मिळणं खरोखरच चांगलं असतं. त्याशिवाय इथं टिकून राहणं कठीण असतं. हे ऐकून ती छानशी हसली होती. एक कलाकार म्हणून तुला चांगली संधी मिळणं, चांगली भूमिका मिळणं हे जसं महत्त्वाचं आहे तसं तुम्ही ते काम चांगल्या पद्धतीनं करणं देखील महत्त्वाचं आहे. ते आलिया करते. तिच्याकडे चांगल्या संधी चालून येतात.’

भार्गवी चिरमुलेचा नवीन लुक पाहिलात का? अभिनेत्रीच्या नव्या अंदाजाची होतेय चर्चा


ऐश्वर्या आणि आलियाच्या सिनेमांची चर्चा

ऐश्वर्या राय सध्या तिच्या पेन्नियन सेल्वन सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तर आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमामुळे आलिया चर्चेत आली. या सिनेमाला यश मिळावे यासाठी आलिया, रणबीर कपूर आणि सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी उज्जैन इथल्या महाकाल मंदिरात गेले होते. परंतु हिंदूत्ववादी संघटनांनी आलिया आणि रणबीरला मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यामुळे या दोघांना दर्शन न घेताच परतावं लागलं. त्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट वाद सुरू झाले आहेत. तर ऐश्वर्या रायचा PS-1 ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला

मुंबई : बऱ्याच जणांच्या घरी आलेल्या बाप्पांचं विसर्जन झालं. अनेक कलाकार आता सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला …

कार्यक्रम रद्दही करू शकलो असतो पण…; आजीच्या निधनामुळे अंजिक्य झाला भावुक

मुंबई,  08 सप्टेंबर: मन उडू उडू झालं मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच सगळ्यांचा लाडका …