आईचं मुलांवर निःस्वार्थी प्रेम असतं,मग ती अनिरुद्धची आई असली तरी ही.. मिलिंद गवळींची खास पोस्ट

मुंबई : आई कुठे काय करते मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. मिलिंद गवळी या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध देशमुख या पात्राचा विक्षिप्तपणा, त्याचा तऱ्हेवाईकपणा, तुसडा स्वभाव असल्यानं त्याचं घरात कुणाशी पटत नाही.

मालिकेत अलिकडेच अनिरुद्ध आणि त्याची आई कांचन यांच्यात एक हृद्य प्रसंग चित्रीत झाला. त्या प्रसंगांबद्दल मिलिंद गवळी यांनी एक प्रदीर्घ पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कांचन देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे.

वैभव मांगलेंची चिंची चेटकीण लोकप्रिय, आता म्हणतायत ती मी नव्हेच! नक्की काय झालंय?

मिलिंद यांची पोस्ट

अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. मालिकेतील सहकलाकारांबद्दल, त्यांचे विविध किस्से,अनुभव अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्धच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेतील कांचन आणि अनिरुद्धचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.


हे शेअर करत असताना त्यांनी एक प्रदीर्घ पोस्टही लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्चना पाटकर यांचं आणि त्यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे. तसंच अलिकडेच मालिकेत प्रसारित झालेल्या एका प्रसंगाच्या चित्रीकरणाची आणि त्या प्रसंगाच्या मागची एक भावुक गोष्ट सांगितली आहे.

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘एकेकाळी कर्तृत्ववान अनिरुद्ध आता फारच असह्य झाला आहे. त्याची व्यथा तो सतत मांडत असतो. अरुंधतीला यश मिळालं आहे. ती खूप पुढे निघून गेलेली आहे, म्हणून त्याला त्रास होतोय, असं जे सगळ्यांना वाटतं तसं नाहीये. अमिताभ बच्चन जया भादुरी यांच्या ‘अभिमान’ सिनेमासारखं हे नाहीये असं तो म्हणतोय.’

आई कुठे काय करते : प्रेमाचं राहू दे बाजूला, आशुतोषच्या बेतलं जीवावर!

‘हे सगळं तो जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतो आहे. त्याची आई सोडल्यास, म्हणजेच कांचन आई सोडल्यास, दुसरा कुणाचाही त्याच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. शेवटी कांचन आई ती बिचारी आई आहे. तिच आपल्या मुलाला आधार देणार, आई मुलांवर निःस्वार्थी प्रेम करत असते. मग ती अनिरुद्धची आई असली तरी शेवटी ती आईच आहे.’


या पोस्टमध्ये मिलिंद यांनी अर्चना पाटकर यांना टॅग करत त्यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘अर्चनाताई पाटकर यांनी हा सीन खूप छान केला, भावनाप्रधान प्रसंग त्या खरंच खूपच छान करतात. प्रसंगाचं चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी त्या मिश्किलपणे हसत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला, की चटकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांचे डोळे भरून जातात, आवाजात एक वेगळाच कंप निर्माण होतो, समोरच्याच्या काळजाला जाऊन तो असा भिडतो की समोरच्या कलाकारांचेही डोळे भरून येतात. या सीनमध्ये त्यांच्याकडे पाहिलं आणि माझेही डोळे भरून आले. अर्चनाताई खूप सारं प्रेम.’


मिलिंद गवळीची ही पोस्ट पाहून चाहत्यांनीदेखील कमेंट केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं की, ‘खरंच काळजाला भिडणारा प्रसंग होता तो’, तर आणखी एकानं लिहिलं आहे की, ‘या मालिकेची सर्वात मोठी बाजू म्हणजे उत्कृष्ट संवाद आणि कलाकारांचे सुंदर अभिनय.’

‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटात



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …