आदित्य ठाकरेंचा फिल्मी अंदाज! शाहरुखच्या 29 वर्ष जुन्या डायलॉगसह दमदार फटकेबाजी

मुंबई 16 सप्टेंबर :  आजवर बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे आले आणि हिट झाले. काही सिनेमे आणि त्यांचे डायलॉग आजही तितकेच फेमस आहेत. 1993मध्ये आलेला शाहरुख खानचा ‘बाजीगर’ हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे.  शाहरुख काजोलचा रोमँटिक अंदाज आणि अनु मलिक यांची सदाबहार गाणी त्यामुळे आजही बाजीगर प्रेक्षकांसाठी तितकाच खास आहे. सिनेमा हिट होण्यामागचं आणखी कारण म्हणजे सिनेमाचे दमदार डायलॉग्स. ‘हारके भी जितने वाले को बाजीगर केहते हैं’  हा शाहरुखचा डायलॉग जगप्रसिद्ध झालाय. अनेक जण या डायलॉगची कॉपी करतात. या डायलॉगच्या मिमिक्रीचे लाखो व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण इतकंच नाही महाराष्ट्राच्या राजकारणतही शाहरुखचा डायलॉग पहायला मिळतोय.

शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरेंच्या झालेल्या आजच्या सभेमध्ये आदित्य शाहरुखच्या 29 वर्ष जुन्या सिनेमातील डायलॉग वापरुन जबरदस्त फटकेबाजी करताना दिसले. ‘हारके भी जितने वाले को बाजीगर कहते’, म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधला.

हेही वाचा –  ‘स्वत:ला खोका आणि महाराष्ट्राला धोका’, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर जहरी टीका
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘बाजीगरमध्ये एक डायलॉग आहे की हारके भी जितने वाले को बाजीगर कहते हैं. पण आपल्या महाराष्ट्रात नवीन डायलॉग आहे. आपल्याकडे एक एक नवीन प्रोजेक्ट येत असतात. पण आल्याकडे आल्यानंतर ते पळून कसे जातात म्हणून जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं’.  आदित्यच्या फिल्मी फटकेबाजीनंतर भाषणावर चांगल्याच टाळ्या पडल्या.

बाजीगर सिनेमामुळे अभिनेता शाहरुख खानच्या फिल्मी करिअरला खऱ्या अर्थानं दिशा मिळाली. बॉलिवूडचा किंग बनवण्यात शाहरुखसाठी हा सिनेमा फार महत्त्वाचा ठरला. 12 नोव्हेंबर 1993मध्ये बाजीगर सिनेमा प्रदर्शित झाला होता.  शाहरुख काजोलबरोबर सिनेमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी, जॉनी लिव्हर, विनोद राठोड, सुशांत रे, अनु मलिक, राखी गुलझार हे कलाकार होते.  शाहरुख सिनेमा विलन असला तरी तो सुपरहिट ठरला.  शिल्पा शेट्टी या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सर्वोत्तम अभिनेता म्हणून शाहरुखला अवॉर्ड मिळाला.

बाजीगर ओ बाजीगर, ऐ मेरे हमसफर, समज कर चाँद जिसको, ये काली काली आँखें, किताबें बहुत सी, तेरे चेहरे पे सारखी हिट गाणी सिनेमानं दिली.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

महाराष्ट्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …

अक्षय कुमारने पुन्हा जिंकलं सगळ्यांचं हृदय; मुलीसाठी केली खास गोष्ट

मुंबई, 20 सप्टेंबर : प्रत्येक बाप हा आपल्या मुलीसाठी खूप खास असतो. त्याचबरोबर वडिलांसाठीही मुलगी …