लठ्ठपणामुळे व्हाल डायबिटीजसारख्या 5 भयंकर आजारांचे शिकार, पोटावरची चरबी जाळण्यासाठी प्या ‘हे’ 4 प्रकारचे घरगुती चहा!

दरवर्षी ४ मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिवस (World Obesity Day) साजरा केला जातो. या आजाराबाबत जनजागृती करणे हेच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. खरं तर लठ्ठपणा ही एक महामारी बनली आहे ज्यामुळे जगभरातील अब्जावधी लोक प्रभावित होत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, लठ्ठपणा आणि वाढलेल्या अतिवजनामुळे दरवर्षी अंदाजे 2.8 दशलक्ष लोक मरत आहेत. खाण्यापिण्याच्या खराब सवयी, बैठी जीवनशैली, अनुवांशिक समस्या, आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक कारणांमुळे लठ्ठपणाचा लोकांवर झपाट्याने परिणाम होत आहे.

खरं तर लठ्ठपणा केवळ तुमच्या सौंदर्यावरच परिणाम करत नाही तर यामुळे अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोकाही निर्माण होतो. जर तुम्ही वजन वेळीच कमी केले नाही तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब (high blood pressure), हृदयविकार (cardiac arrest), मधुमेह (diabetes), ऑस्टियोआर्थरायटिस (arthritis) आणि स्लीप एपनियाचा (sleep apnea) धोका वाढू शकतो. (फोटो साभार: istock by getty images)

ग्रीन टी

लठ्ठपणावर मात करण्यासाठी तुम्ही दररोज ग्रीन टी चे सेवन केले पाहिजे. अनेक अभ्यासांत हे सिद्ध झाले आहे की ग्रीन टी वजन आणि शरीरावरील चरबी दोन्ही कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 2008 च्या संशोधनाच्या परिणामात जे लोक ग्रीन टी पित नाहीत त्यांच्या तुलनेत जे लोक ग्रीन टी पितात त्यांचे वजन 7.3 पौंडने (3.3 किलोने) जास्त कमी झालेले दिसून आले.

हेही वाचा :  Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!

(वाचा :- 120 किलोच्या मुलाची वेटलॉस स्टोरी वाचून व्हाल हैराण, चपाती आणि भात न सोडताच घटवलं तब्बल 37 किलो वजन!)

ब्लॅक टी

अर्थातच ब्लॅक टी प्यायला थोडा कडू असतो पण त्यामुळे लठ्ठपणा आटोक्यात येतो. बाजारात ब्लॅक टी चे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील तुम्ही एक उत्तम ब्लॅक टी निवडू शकता. 111 लोकांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की कॅफिनयुक्त पेये पिण्यापेक्षा तीन महिने दररोज तीन कप ब्लॅक टी पिणे वजन कमी करण्यात अधिक उपयुक्त आहे.

(वाचा :- Foods for blood vessels : शरीरातील सर्व कमजोर नसा एका आठवड्यात होतील मजबूत, आजपासूनच सुरू करा ‘ही’ 5 कामं..!)

व्हाइट टी सुद्धा लाभदायक

जेव्हा आपण व्हाइट टी बद्दल बोलतो तेव्हा तो दुधाचा चहा नसतो. वास्तविक व्हाइट टी अनेक प्रकारचा असून बाजारात तो सहज उपलब्ध होऊ शकतो, त्याची चवही इतर प्रकारच्या चहापेक्षा खूप वेगळी आहे. त्याची चव थोडी गोड असते. काही टेस्ट-ट्यूब अभ्यासातून असे दिसून आले आहे की हा चहा शरीरातील चरबी कमी करण्यासाठी, तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे.

हेही वाचा :  फक्त तीन आठवड्यांत जळून जाईल शरीरातील सर्व चरबी, फॉलो करा या 5 टिप्स

(वाचा :- Brain Hemorrhage : नव-याने मारल्यामुळे या मॉडेलला झाला ब्रेन हॅमरेज, झाली अशी विचित्र हालत, जाणून घ्या या आजाराची लक्षणे, कारणे व उपाय!)

हर्बल टी

हर्बल टी मध्ये गरम पाण्यात औषधी वनस्पती, मसाले आणि फळे यांचे मिश्रण असते. त्यात सहसा कॅफिन नसते. यामध्ये रुईबोस चहा, आल्याचा चहा, गुलाबाचा चहा आणि हिबिस्कस चहा यांचा समावेश आहे. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की हर्बल टी वजन कमी करण्यात आणि चरबी जाळण्यात मदत करू शकते.

(वाचा :- Ghee benefits : आयुर्वेद एक्सपर्ट्सचा सल्ला, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हा’ 1 पदार्थ, आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर पडतील व झटपट होईल वेटलॉस!)

जलजीरा

उन्हाळ्याच्या दिवसांत लोक तहान शमवण्यासाठी हमखास जलजीरा पितात. जलजीरा प्यायल्यानंतर खूप ताजेतवाने व रिफ्रेशिंग फिल होते. हे प्यायल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. यामध्ये असलेले पोषक घटक तुमच्या पोटाच्या सर्व समस्या दूर करतात. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्यास जलजीरा प्यायल्याने शरीरातील उष्णता दूर होते. यामुळे तुमचे वजन तर कमी होतेच पण पचनसंस्थाही निरोगी राहण्यास मदत होते.

हेही वाचा :  Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!

(वाचा :- Quick Weight loss : आळशी आहात पण झटपट वेटलॉस करायचंय? झोपूनच करा ‘ही’ 5 साधीसोपी कामं, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीराची चरबी!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …