फक्त तीन आठवड्यांत जळून जाईल शरीरातील सर्व चरबी, फॉलो करा या 5 टिप्स

लठ्ठपणा (Obesity) ही अत्यंत वाईट जीवनशैलीशी संबंधित स्थिती आहे. काही प्रकरणांमध्ये, अन्य दुसऱ्या रोगांमुळे सुद्धा लठ्ठपणा निर्माण होतो. तो वेळीच कमी न केल्यास कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हार्ट स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅक यांसारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात. पण वजन कमी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बरेच लोक लठ्ठपणाला गांभीर्याने घेत नाहीत. पण आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला सांगतोय की वजन कमी करणे एवढेही अवघड नाही जेवढे चित्रपट आणि जाहिरातींमध्ये दाखवले जाते.

तुम्ही योग्य मार्ग अवलंबला तर तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास (Weight loss journey) डाएटिंगशिवाय आणि जिममध्ये तासनतास घाम न गाळता सुद्धा पूर्ण होऊ शकतो. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वजन कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय शेअर केले आहेत. या आयुर्वेदिक वजन कमी करण्याच्या टिप्सबद्दल, त्यांचा दावा आहे की हे नियम नियमितपणे पाळल्यास केवळ 3 आठवड्यात वजन कमी करता येऊ शकते. (फोटो साभार :- TIO, Pexels)

रोज प्या आल्याचे पाणी

वजन कमी करण्याचा प्रवास सोपा असावा आणि कमीत कमी वेळात वजन कमी व्हावे असे वाटत असेल तर साध्या पाण्याऐवजी दिवसभर आल्याचे पाणी पिण्याची शिफारस आयुर्वेद तज्ज्ञ करतात. आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्याचा शरीराच्या चरबी जाळण्याच्या (थर्मोजेनेसिस), कार्बोहायड्रेट्स पचवण्याच्या आणि इन्सुलिनचा वापर करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, ज्या गोष्टी वजन नियंत्रणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सुरुवात म्हणून हा साधा सोप्पा उपाय नक्की सुरू करून पहा.

  • असं करा हे पाणी तयार –
हेही वाचा :  Quick Weight loss : आळशी आहात पण झटपट वेटलॉस करायचंय? झोपूनच करा 'ही' 5 साधीसोपी कामं, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीराची चरबी!

1 लिटर पाणी घ्या, त्यात अर्धा चमचे सुंठ पावडर घाला आणि हे पाणी 750 मिलीलीटरपर्यंत कमी होत नाही तोवर याला चांगले उकळवा. याशिवाय ताजे आले पाण्यात 5 ते 10 मिनिटे उकळून ते गाळून सुद्धा तुम्ही त्या पाण्याचे सेवन करु शकता.

(वाचा :- Weight Loss : अँटी-ऑबेसिटी गुणधर्मांनी ठासून भरलेत हे 5 कुकिंग ऑइल्स, जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी)

भरपूर चाला

सकाळी किंवा रात्री 40 ते 50 मिनिटे चालल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते, कारण यामुळे कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न होतात. नियमित चालण्याने पोटाची चरबीही कमी होऊ शकते. त्यामुळे शक्य तितके दिवसभर चाला. जेवढे चालालं तेवढी तुमच्या शरीराची हालचाल होईल आणि तुम्ही निरोगी राहाल. चालणे हा जगातील सर्वात सोप्पा आणि सर्वात फायदेशीर व्यायाम असल्याचे उगाच सांगितले जात नाही. त्यामुळे जमेल तेवढे चाला.

(वाचा :- Vitamin K Rich Foods : शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ नाहीतर)

कपालभाती प्राणायाम करा

कपालभाती प्राणायाम वजन कमी करण्यासाठी उत्तम व्यायाम आहे, कारण त्याचा थेट संबंध आपल्या शरीरातील चयापचय क्रिया, आतड्यांसंबंधिचे आरोग्य आणि पचनाशी आहे. या प्राणायामाचा नियमितपणे 10 ते 15 मिनिटे सराव केल्यास त्याचा परिणाम काही दिवसांतच दिसून येतो. म्हणूनच जाणकार सुद्धा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना हाच प्राणायाम करायला सांगतात. प्राचीन काळापासून वापरात आलेल्या या कपालभाती प्राणायमाचे मोठे फायदे आजवर दिसून आले आहेत.

हेही वाचा :  Samruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल

(वाचा :- स्टडीमध्ये खुलासा; घोरणा-या लोकांना आहे Cancer चा सर्वात जास्त धोका, या 5 घरगुती उपायांनी वेळीच कमी करा जोखिम)

सूर्यनमस्कार करा

सूर्यनमस्कार हे 12 वेगवेगळ्या योगासनांचे संपूर्ण चक्र आहे, जे आरोग्याला अनेक फायदे देतात. यामध्ये वजन कमी करणे देखील समाविष्ट आहे. सूर्यनमस्काराचा एक सेट 13.90 कॅलरीज बर्न करू शकतो. अशा परिस्थितीत, जाणकार सांगतात की, सूर्यनमस्काराचे 12 सेट नियमितपणे करावेत. तुम्ही सुरुवातीला 2 सेट करू शकता आणि हळूहळू मग दिवसागणिक शरीराराला सवय होत जाईल तसे सेट वाढवत न्यावेत. मग बघा तुम्हाला काहीच दिवसांत तुमच्या वजनात झालेला फायदा दिसेल.

(वाचा :- मॅच दरम्यान स्टार फुटबॉलरचं हृदय पडलं अचानक बंद, या भयंकर आजाराचं दिसत नाही एकही लक्षण, 6 गोष्टींपासून रहा दूर)

फॉलो करा सर्केडीयन इंटरमिटेंट फास्टिंग वेट लॉस डाएट

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा एक डाएटचा अनोखा पण उपयुक्त प्रकार असून इंटरमिटेंट फास्टिंग वेट लॉस डाएट सारखाच असतो. परंतु यामध्ये सर्केडीयन रिदमचा ताळमेळ राखून भोजन केले जाते. हे डाएट फॉलो करताना सूर्योदयानंतर नाश्ता आणि सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करावे. सर्केडियन इंटरमिटंट फास्टिंगमध्ये तुम्ही सकाळी 9-10-11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5-6-7 वाजेपर्यंत कधीही खाऊ शकता. हा वेगळा उपाय एकदा ट्राय करायला हरकत नाही.

हेही वाचा :  पोट, मांड्या, कंबरेची चरबी झटक्यात जाईल जळून, फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेला 7 दिवसांचा Weight Loss Diet Plan

(वाचा :- कॅन्सर, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधाने तडपवून मारतो सकाळ-सायंकाळ घेतला जाणारा हा पदार्थ, आजच बंद करा)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

वेटलॉससाठी आयुर्वेदिक उपाय..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …