हे 5 कुकिंग ऑइल्स जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी

शरीरावर वाढलेली चरबी (Fat loss) कमी करण्यासाठी काय खाऊ नये यापेक्षा काय खावे हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे असते. एक्सपर्ट्स देखील म्हणतात की वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करणे किंवा जेवणे सोडून देणे आवश्यक नाही. त्याउलट तुमच्या आवडत्या गोष्टी आहारातून न काढता अँटी-ऑबेसिटी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करण्यावर भर दिला पाहिजे. याची सुरूवात आपण कुकिंग ऑईलने करू शकता. जर तू जर तुम्ही नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये (New Year Resolution) वजन कमी करण्याचा निर्णय घेतला असेल तर आजपासूनच ही 5 प्रकारची हेल्दी ऑइल्स वापरण्यास सुरुवात करा.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑइलमध्ये जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals), अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants), फॅटी ऍसिडस् (Fatty Acids) यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. NCBI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, ऑलिव्ह ऑइलमध्ये लठ्ठपणा कमी करणारे गुणधर्म देखील आहेत. 3 वर्षांच्या निरीक्षणात्मक अभ्यासात असे आढळून आले की, ऑलिव्ह तेलात तळलेले खूप जास्त मेडीटेरेनियन डाएट घेणा-या लोकांमध्ये अन्य लोकांच्या तुलनेत प्लाझ्मा अँटी-ऑक्सिडेंट क्षमता वाढली आणि वजन देखील कमी झाले. याशिवाय ऑलिव्ह ऑईल हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

हेही वाचा :  महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!

(वाचा :- Vitamin K Rich Foods : शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ नाहीतर)

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल हे भारतीय घरांमध्ये वर्षानुवर्षे वापरले जाणारे स्वयंपाकाचे तेल आहे. मोहरीच्या तेलामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण फारच कमी असते, ज्यामुळे ते आरोग्यदायी तेल मानले जाते. त्यात पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी निरोगी मानले जातात. रिसर्चगेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मोहरीच्या तेलामध्ये असलेले पोषक घटक लठ्ठपणासारख्या चयापचयाच्या रोगांचा धोका कमी करू शकतात.

(वाचा :- स्टडीमध्ये खुलासा; घोरणा-या लोकांना आहे Cancer चा सर्वात जास्त धोका, या 5 घरगुती उपायांनी वेळीच कमी करा जोखिम)

नारळाचे तेल

खोबरेल तेल नेहमीच त्वचा, केस आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे ओळखले जाते. अशा स्थितीत वजन कमी करण्यासाठीही याचे सेवन चांगले मानले जाते. त्यात असलेले मिडीयम चेन फॅटी ऍसिड (MCFAs) जसे की लॉरिक ऍसिड, कॅप्रेटेलिक अॅसिड आणि कॅपरिक अॅसिड शरीरातील अतिरिक्त चरबीला काढून टाकण्याचे काम करतात.

(वाचा :- मॅच दरम्यान स्टार फुटबॉलरचं हृदय पडलं अचानक बंद, या भयंकर आजाराचं दिसत नाही एकही लक्षण, 6 गोष्टींपासून रहा दूर)

हेही वाचा :  लॅपटॉपवर काम करतांना चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका जवळ, ठेवल्यास लॅपटॉप होणार कायमचा खराब, पाहा डिटेल्स

अव्हाकॅडो

अव्हाकॅडो तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि ओलिक फॅटी ऍसिड असतात, जे पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी असतात. त्याचा वापर मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका देखील कमी करू शकतो. पेन स्टेटच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक चार आठवडे दररोज 40 ग्रॅम (सुमारे 3 चमचे) हाय-ओलिक तेलाचे सेवन करतात त्यांच्या पोटाची चरबी हाय पॉलिसॅच्युरेटेड तेलाचे सेवन करणा-या लोकांच्या तुलनेत 1.6% कमी झाली होती.

(वाचा :- कॅन्सर, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधाने तडपवून मारतो सकाळ-सायंकाळ घेतला जाणारा हा पदार्थ, आजच बंद करा)

नट्स-सीड्स ऑईल

काही नट्स आणि बियांच्या तेलांमध्येही मोनोअनसॅच्युरेटेड फॅट जास्त असते आणि त्यांचा स्वयंपाकासाठी वापर केला जाऊ शकतो. हेझलनट तेलामध्ये 82 टक्के मोनोअनसॅच्युरेटेड आणि फक्त 7 टक्के संतृप्त चरबी असते. सूर्यफूल बियांच्या तेलामध्ये 79 टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि 14 टक्के सॅच्युरेटेड फॅट असते. तर बदामाच्या तेलात ६५ टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि ७ टक्के सॅच्युरेटेड फॅट असते. अशा परिस्थितीत, वजन कमी करण्यासाठी तुम्ही त्यांचे सेवन करू शकता, कारण उच्च मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असलेल्या तेलामध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असतात जे झपाट्याने चरही जाळण्यास मदत करतात.

हेही वाचा :  Maharastra News : मराठा नाराज तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?

(वाचा :- वेटलॉस, पोट साफ न होणं, डायबिटीज, बॉडी डिटॉक्स, डायजेशनच्या समस्या होतील दूर, खा हा 1 पदार्थ)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …