लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन…

Viral News : खळण्याच्या रुपात बाप आपल्या लेकराला आनंद विकत घेऊन देतो. एखादं खेळण आवडलं की मुलं आपल्या आपल्या वडिलांकडे ते खेळण घेण्याचा हट्ट करतात. कितीही महाग असलं तरी आपल्याला मुलाला ते खेळून विकत घेवून देण्याचा प्रयत्न वडिल करतात. मात्र, इंग्लंडजवळील गर्न्सी प्रांतात एका पित्याने आपल्या लेकाला घेतलेले खेळण पाहून सगळेच अचंबित झाले. लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा. तर, बापानं मुलाचा हट्ट पूर्ण करम्यासाठी जे खेळणं  आणलं ते उचलण्यासाठी क्रेन मागवावी लागली. क्रेनच्या मदतीने हे खेळण घरी आणण्यात आले.  

मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. Andre Bisson (एंद्रे बिसन) असे या पित्याचे नाव आहे. Andre Bisson हा  Guernsey अर्थात इंग्लंडजवळील गर्न्सी प्रांतात राहणारा आहे. गर्न्सी हा इंग्लिश खाडीमधील ग्रेट ब्रिटनचा एक भाग आहे. गर्न्सी इंग्लंडपासून 121 किमी तर फ्रान्सपासून 48 किमी अंतरावर आहे. Andre Bisson याच्या चार वर्षाच्या मुलाने त्याच्याकडे डायनॉसर मागितला. मला खूप मोठा डायनॉसर पाहिजे असं त्याच्या मुलाने त्याला सांगितले.

आवाढव्य डायनॉसर खरेदी केला

मुलाने डायनॉसर मागितला म्हणून Andre Bisson याने आवाढव्य डायनॉसर खरेदी केला. हा डायनॉसर  कित्येक फूट लांब आहे. या डायनॉसरची डिलिव्हरी क्रेनने करण्यात आली. हा डायनॉसर क्रेनने आणून Andre Bisson  याच्या घरातील गार्डनमध्ये ठेवण्यात आला. हा आवाढव्य डायनॉसर  पाहून Andre Bisson याचा मुलगाच नाही तर त्याचे शेजारी देखील अचंबित झाले. 

हेही वाचा :  बापरे! पुन्हा कोरोनाचा धोका, 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लागला लॉकडाऊन

लाखो रुपयांचा आवाढव्य डायनॉसर 

Andre Bisson याने 1000 पाऊंड अर्थात भारतीय रुपयांमध्ये 1,05, 714.90 रुपयांना हा  आवाढव्य डायनॉसर खरेदी केला आहे. हा डायनॉसर  6 मीटर लांब आणि 2.3 मीटर उंच आहे. याचे वजन जवळपास दोन टन इतके आहे. Andre Bisson याने एका अ‍ॅम्युझमेंट पार्कमधून हा आवाढव्य डायनॉसर विकत घेतला. या अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये क्लिअरन्स सेल सुरु होता. येथे हा डायनॉसर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. सेल बद्दल समजताच Andre Bisson तात्काळ ऑनलाइन बुकिंग करत हा  आवाढव्य डायनॉसर खरेदी केला. एवढ्या मोठ्या टॉयच्या ऑर्डरची डिलीव्हरी लॉरीतून करणे अशक्य होते. यामुळे कंपनीने क्रेनच्या मदतीने Andre Bisson याच्या घरी हा आवाढव्य डायनॉसर डिलीव्हर केला. आवाढव्य डायनॉसर पाहून  Andre Bisson खूपच आनंदी झाला. Andre Bisson  याने घराच्या बागेत हा डायनॉसर  ठेवला आहे. त्याचा मुलगा या बागेतच या डायनॉसर सोबत खेळतो.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …