27 December History: हाहाकार, हजारो मृत्यू… आजचा दिवस सारं जग विसरु शकत नाही, का ते पाहा…

Trending News: प्रत्येक दिवस खास असतो. मग त्यामागे सकारात्मक कारण असो किंवा नकारात्मक. त्याची सर्वार्थानं चर्चा होते हे मात्र नाकारता येत नाही. आजचा हा दिवस म्हणजेच 27 डिसेंबरसुद्धा तसंच काहीसं. ही तारीख, किंवा हा एक दिवस वर्षाच्या शेवटाकडे खुणावत असला तरीही जगाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्वं थोडं वेगळं आहे. (trending news History of 27th December major events and tragedies know more)

आजच्या दिवशी काय झालं होतं? 

1985 मध्ये युरोपातील (Europe) दोन शहरांवर कट्टरपंथियांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 16 जणांचा जीव गेला होता. या हल्ल्यामध्ये 100 हून अधिकजण जखमी झाले होते. इटलीतील रोमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यामध्ये 13 नागरिक मारले गेले होते. या अंधाधुंद गोळीबारात 6 पैकी तीन बंदुकधारीही मारले गेले होते. 

याच दिवशी ऑस्ट्रेलियातील (Australia) विएना विमानतळावर तीन हल्लेखोरांनी तैल अवीव येथे जाणाऱ्या प्रवाशांवर बॉम्बहल्ला केला होता. प्रवाशांवर केलेल्या या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. याशिवायही या दिवशी अशा काही घटना घडल्या होत्या, ज्यामुळं काळजात चर्रsss झालं. 

 

सर्वच नकारात्मक गोष्टींमध्ये एक अशीही घटना घडली होती, ज्यामुळं भावनांना शब्दांवाटे व्यक्त करण्याचं कसब साऱ्या जगाला उमगलं. कारण, त्याची महती सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या महान उर्दू शायर मिर्झा गालिब (Mirza ghalib) यांचाही जन्म आजचाच 1797 सालचा. भारतासाठी हा दिवस जरा जास्तच खास, कारण 1911 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कोलकाता येथील अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच ‘जन गण मन’ गायलं गेलं होतं. 

हेही वाचा :  गृहनिर्माण प्रकल्पांबाबत महारेराचा सर्वात मोठा निर्णय; QR कोड बंधनकारक

27 डिसेंबरला आणखी काय काय घडलं होतं? 

– 2007 मध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यावर रावळपिंडी येथे हल्ला करण्यात आला होता. यामध्येच त्यांचा मृत्यू ओढावला. 

– 2000 या वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये लग्नाआधीच्या संबंधांना सरकारी मान्यता मिळाली होती. 

– 1979 मध्ये अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथ पाहता रशियन सैन्याने हल्ला केला होता. 

– 1975 मध्ये आजच्याच दिवशी झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील चासनाला कोळसा खाणीत झालेल्या दुर्घटनेत 372 जणांचा मृत्यू झाला होता. 

– 1939 मध्ये तुर्कीत आजच्याच दिवशी महाभयंकर भूकंपात 40 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला होता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …