Man, Woman ची व्याख्याच बदलली; Cambridge Dictionary मुळे नवा वाद?

Trending News : Cambridge Dictionary  नं Man आणि Woman अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या व्याख्या बदलल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सहसा विविध संज्ञांची सविस्तर आणि सर्वमान्य व्याख्या डिक्शनरीमध्ये पाहायला मिळते. इथं नमूद करण्यात आलेल्या अर्थांचा वापर आणि संदर्भ घेत पुढे त्यांचा वापरही दैनंदिन वापरात केला जातो. पण, आता मात्र या बदललेल्या व्याख्या लेखन नियमांध्ये येण्यापूर्वी एका नव्या वादानं डोकं वर काढलं आहे.

काय आहे ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ यांची नवी व्याख्या? 

Woman – एक प्रौढ व्यक्ती जी विचारानं महिला म्हणून जगते आणि हीच तिची ओळख असते. अनेकदा जन्मत: ती स्त्री/ पुरुष नसली आणि विचारानं मात्र ही व्यक्ती महिलांचं आयुष्य जगत असली तरीही ती स्त्री असते. 

Man- जन्मत: स्त्री किंवा पुरूष असूनही एखादी व्यक्ती विचारानं पुरुषांप्रमाणेच आयुष्य जगत असली तरीही त्यांची गणती पुरुषांमध्येच होते. 

जागतिक स्तरावर महिला आणि पुरुषांच्या विचारसरणी आणि जगण्यामध्ये होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर या नव्या व्याख्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामुळं सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केम्ब्रिजच्या या नव्या व्याख्यांमुळे ट्रान्सवुनमन आणि ट्रान्समेन यांनाही स्थान देण्यात आल्याचं काहीचं म्हणणं आहे. 

हेही वाचा :  Jio 5G: फोनमध्ये ON करा या सेटिंग, तात्काळ मिळेल 5G Service

कधी करण्यात आले हे बदल? 
ऑक्टोबर महिन्यात हे सर्व बदल करण्यात आले. दरम्यान, सदर मुद्द्यावरून वादाला तोंड फुटल्याचं पाहून केम्ब्रिजच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अभ्यासकांनी Woman या शब्दाचा होणारा वापर पाहूनच त्यानंतर त्याची ही नवी व्याख्या ठरवली. असं असलं तरीही या शब्दाची पहिली आणि प्राथमिक व्याख्या मात्र कायम An adult female human being अशीच असेल. 

Cambridge Dictionary Update The Definition Of Man And Woman news in marathi

नव्या व्याख्यांनीसार डिक्शनरीमध्ये देण्यात आलेली उदाहरणंही एकदा पाहाच 

नव्या व्याख्येनुसार Woman चं उदाहरण देत इथं लिहिण्यात आलंय, She was the First trans woman elected to a national office / Mary is a woman who was Assigned male at birth. 

Man या शब्दाचा वापर केलं गेलेलं उदाहरण आहे, Mark is a trans man / their Doctor Encouraged them to live as a man for a while before undergoing surgical transition.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …