सैल आणि ओघळणाऱ्या स्तनांवर असे कराल उपचार, अगदी नैसर्गिक पद्धतीने मिळेल सुडौल फिगर

ओघळणारे स्तन हे स्तनाच्या स्वरूपातील बदलाचा एक भाग आहे. जो बहुतेक महिलांना अनुभवता येतो. विशेषत: वाढत्या वयानुसार किंवा लठ्ठपणामुळे अनेक महिलांचे स्तन ओघळतात. स्तनांचा आकार आणि घट्टपणा व्यक्तीपरत्वे बदलतो आणि वयानुसार त्याचा विकास आणि त्यानुसार बदल झाल्याचे दिसून येते. पण वाढत्या वयाव्यतिरिक्त स्तन सैल होण्याची अनेक कारणे असतात. कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणे सोपे जाते.

ओघळणाऱ्या स्तनांवर घरगुती उपाय देखील तितकेच प्रभावी ठरतात. अशावेळी डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक यांनी सांगितलेल्या सोप्या टिप्स अतिशय फायदेशीर ठरतील. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

स्तन ओघळणाऱ्या ​कारणे काय?

  • · वृद्धत्व
  • · गुरुत्वाकर्षण
  • · हार्मोनल असंतुलन आणि गर्भनिरोधकाचा वापर
  • · रजोनिवृत्ती
  • · व्यायामाच्या चुकीच्या पध्दती
  • · तुम्ही परिधान करता करत असलेल्या ब्रा चुकीच्या मापात असणे
  • · वजनामध्ये येणारा चढ उतार
  • · लठ्ठपणा किंवा उच्च बीएमआय
  • · धूम्रपान
  • · एकाधिक गर्भधारणा
  • · स्तनपानाचा इतिहास
  • · शरीराच्या वरच्या भागातील व्यायामाचा अभाव

(वाचा – विक्रम गोखले यांच्या निधनाला हा आजार कारणीभूत? ६ महत्वाच्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष)

हेही वाचा :  अभिजात सौंदर्याची खाण आहे सागरिका,झहीरच काय दुनिया झालीये ‘क्लीन बोल्ड’!

सैल स्तनांमागे वैज्ञकीय कारण

ऊती कमकुवत झाल्यामुळे स्तनाची त्वचा सैल होते आणि या स्थितीला वैद्यकीयदृष्ट्या ब्रेस्ट पीटोसिस असे म्हणतात. सॅगिंग ब्रेस्टमुळे महिला सर्वच कपड्यांमध्ये फिट दिसू शकत नाही. लिफ्ट ब्रा सारख्या पर्यायामुळे स्तनांवर स्तनाची त्वचा काही प्रमाणात घट्ट दिसू लागते मात्र हा एक तात्पुरता उपाय ठरतो. कॉस्मेटिक सर्जन ब्रेस्ट लिफ्टसाठी सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल अशा दोन्ही उपचारांची शिफारस करतात.

(वाचा – बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याकरता सर्वोत्तम ठरते ‘ही’ भाजी, हाडांना १०० टक्के करेल मजबूत))

सर्जरीचा पर्याय

लेझर उपचार: लेसर किरण हे त्वचेला नवीन कोलेजन आणि इलास्टिनचे उत्पादन करण्यास उत्तेजित करतात. यामुळे वृद्धत्वाचा परिणामही कमी होतो. पहिल्या उपचारात तुम्ही परिणाम पाहू शकता.

  • थर्मेज: त्वचेच्या खोल थरांपर्यंत उष्णता पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया रेडिओफ्रिक्वेंसी लहरींचा वापर करते. तुम्हाला लगेच ऊती घट्ट झाल्याचे दिसून येईल.
  • थ्रेड लिफ्ट: खूप पातळ विरघळणारे धागे स्तनांखाली ठेवले जातात आणि नंतर कॉलर बोनकडे वर खेचले जातात. हे स्तनांना अधिक चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत करते.
  • ब्रेस्ट लिफ्टींग शस्त्रक्रिया किंवा मास्टोपेक्सी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये सर्जन स्तनांवरील अतिरिक्त त्वचा काढून टाकतो आणि त्याचा आकार गोलाकार आणि मजबूत बनवतो. ब्रेस्ट लिफ्टमुळे स्तनाग्र बिंदूंची स्थिती देखील दुरुस्त होऊ शकते. ब्रेस्ट लिफ्टमुळे स्तनांचा आकार बदलत नाही. हे फक्त सॅगिंग स्तनांना एक घट्टपणा देण्यास मदत करते.
हेही वाचा :  Maharastra Politics: 'व्हीप' म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सोप्या भाषेत!

(वाचा – Weight Loss Journey : 95 किलो वजनामुळे कंबर-गुडघे दुखीचा त्रास, चक्क तूप आणि सोया खाऊन केला 28 किलो वेट लॉस))

स्तनांच्या मजबुती करता व्यायाम

या व्यतिरिक्त प्लास्टिक सर्जन काही घरगुती उपाय वापरण्याची शिफारस करतात ज्यांचा समावेश तुम्ही स्तनांची मजबुती आणि सैलसरपणा कमी करण्यासाठी तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये केला पाहिजे.

  • · छातीचा व्यायाम ज्यामध्ये बेंच प्रेस, पुश अप्स सारख्या व्यायामांचा समावेश आहे. परंतु हे प्रयत्न करण्यापूर्वी प्रशिक्षकाकडून योग्य मुद्रा आणि प्रकार जाणून घ्या.
  • · व्यायाम करताना योग्य सपोर्टिव्ह ब्रा घाला कारण ते ऊतींना आधार देतील.
  • · धुम्रपान करू नका
  • · निरोगी वजन राखा आणि निरोगी आहार घ्या
  • · आपल्या स्तनांना दररोज मॉइश्चरायझ करा

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार)

घरगुती पॅक

  • एक काकडी किसून घ्या आणि त्यात एक अंड्याचा पिवळा बलक आणि एक चमचे लोणी मिसळा. आता हे मिश्रण स्तनांवर वरच्या दिशेने आणि त्याभोवती लावा. कोरडे होऊ द्या आणि सुमारे 30 मिनिटानंतर थांबून ते थंड पाण्याने धुवा.
  • अंड्याचा पांढरा भागात १ टीस्पून दही आणि मध घालून चांगले फेटा. हे मिश्रण तुमच्या स्तनांवर हलक्या हाताने लावून मसाज करा सुमारे एक तास ते तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • पाव कप मेथी पावडर पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या स्तनांवर लावा. आता चांगली मालिश करा हे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करेल सुमारे 10 मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.
हेही वाचा :  माझं व नव-याचं कोणतंही प्रायव्हेट आयुष्य उरलेलं नाही, याला कारणीभूत हे दोन व्यक्ती ठरलेत

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितल्या, वजन कमी करताना हमखास केल्या जाणाऱ्या ३ चुका)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …