वाघिणीचं फोटोशूट केल्या प्रकरणी रवीना टंडनचं स्पष्टीकरण

Raveena Tondon: आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी कायम कौतुकाची थाप मिळवणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) यावेळी मात्र एका पोस्टमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला गेलेल्या रवीनानं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. यात ती केटी नावाच्या वाघिणीचं फोटोशूट करताना दिसत आहे. मात्र यात ती वाघिणीच्या अगदी जवळ गेल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं रवीनाला नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. रवीनासोबत सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि जीप चालकालाही नोटीस देणार असल्याची माहिती मिळते. आता रवीनानं या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणारी रवीना? 

रवीना टंडननं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन स्पष्टीकरण दिलंय. ‘काही वृत्तवाहिन्यांनी आम्ही वाघिणीच्या जवळ गेल्याचं दाखवलं, मात्र आम्ही परवानाधारक गाईड आणि गाडीतून गेलो होतो. त्यांना सगळ्या सीमा माहिती असतात. वाघ राजासारखा फिरत असतो आपण केवळ मूकप्रेक्षक असतो. आपली एखादीही अचानक केलेली हालचाल त्यांना विचलीत करु शकते. आमच्या सुदैवाने आम्ही कोणतीही हालचाल केली नाही.  आम्ही शांतपणे केटी वाघिणीला पाहात राहिलो. आम्ही तिच्या वाटेत आलो नाही. यापूर्वी केटी वाघीण पर्यटकांच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.’ असं रवीनानं म्हटलंय.

हेही वाचा :  प्राजक्ता माळीच्या भाळी चंद्रकोर, नाकात नथ नऊवारीत मराठमोळा साज

News Reels

सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राच्या नियमांनुसार सफारीदरम्यान वाघ आणि जीप यांच्यात 20 मीटरचं अंतर असणं गरजेचं आहे. पण रवीनाने या नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळेच आता तिची चौकशी होणार असून तिच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. 

रवीनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राचे उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी माहिती दिली की, ‘रवीना ही 22 नोव्हेंबरला रवीना जंगल सफरीसाठी आली होती. वाघाचा फोटो काढण्यासाठी रवीना वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबली होती. त्यामुळे आता या प्रकरणी वाहनचालक आणि त्यावेळी कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांची चौकशी होणार आहे”. 

 ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘मोहरा’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोहरा चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. रवीना ही वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

 Raveena Tondon : रवीना टंडनच्या अडचणीत वाढ; वाघाच्या जवळ जाऊन व्हिडीओ शूट केल्याने तपास सुरू

हेही वाचा :  बजरंग दल आक्रमक; पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेरील 'पठाण'चे पोस्टर हटवले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …