अभिजात सौंदर्याची खाण आहे सागरिका,झहीरच काय दुनिया झालीये ‘क्लीन बोल्ड’!

सागरिका घाटगेने आपल्या अभिनयाने सर्वाचे मन जिंकले आहेच. पण त्याहीपेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा अधिक होते. नैसर्गिक रूपाची खाण असणारी सागरिका ही रॉयल घराण्यातून आहे. मराठमोळी सागरिकाचे साडीतील लुक झहीरच नाही तर चाहतेही क्लीन बोल्ड झालेत. सागरिकाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

सागरिका नेहमी आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते. यामध्ये तिच्या पेजवर साडीतील दिसणारे फोटो हे तिच्या रॉयल सौंदर्यात भर घालतात. राजेशाही घराण्यातून असणारी सागरिका मेकअपपेक्षाही नैसर्गिक सौंदर्याला अधिक महत्त्व देताना दिसते. पाहुया सागरिकाचे साडीतील वेड लावणारे लुक्स (फोटो सौजन्य – @sagarikaghatge Instagram)

पेस्टल कलर साडी

पेस्टल कलर साडी

सागरिका दिसायला अत्यंत सुंदर असून तिने आपला फिटनेसही राखला आहे. साड्यांची तिची निवड अत्यंत रॉयल दिसून येते. पेस्टल रंगाची ही सागरिकाची साडी खूपच आकर्षक असून कोणत्याही पार्टीसाठी ही साडी उत्तम ठरू शकते. यासह सागरीकाने मॅट मेकअप आणि माफक दागिन्यांची निवड करून लुक पूर्ण केला आहे.

हेही वाचा :  नात्यातील महिलेसोबत अनैतिक सबंध, बायको-मुलाला खबर लागली, अन् नाशकात भल्या पहाटे घडला थरार

ऑर्गेंझा साडीचा रॉयल लुक

ऑर्गेंझा साडीचा रॉयल लुक

राजेरजवाड्यांच्या महालातील राण्यांच्या रॉयल लुकप्रमाणे सागरिकाचा हा साडी लुक दिसून येत आहे. अत्यंत साधा मात्र तरीही त्यात अभिजातता भरलेली जाणवतेय. पेस्टल ब्ल्यू रंग आणि त्यासह मोत्यांच्या दागिन्यांनी सागरिकाने लुक पूर्ण केलाय. तुम्हीही घरच्या एखाद्या समारंभात असा रॉयल लुक नक्कीच करू शकता.

(वाचा – Daljit Kaur Haldi: नव्या आयुष्याची पुन्हा सुरूवात करतेय दलजीत, निखिल पटेलसह हळदीमध्ये न्हाऊन निघाली)

नैसर्गिक सौंदर्य

नैसर्गिक सौंदर्य

सागरिकाच्या बऱ्याच फोटोंमध्ये मेकअपचा लवलेशही दिसून येत नाही. व्हाईट आणि त्यासह प्रिंटेड बुट्ट्या असणाऱ्या या कपड्यांमध्ये सागरिकाचे नैसर्गिक रूप अधिक खुलून आले आहे. मोत्याच्या बांगड्या आणि मोत्याच्या टॉप्स, कपाळावर लहानशी टिकली लावत तिने हा लुक पूर्ण केला असून सुंदर दिसण्यासाठी भारंभार दागिने अथवा भरजरी कपड्यांची गरज नाही हेच दाखवून दिले आहे.

(वाचा – ‘ये रेशमी झुल्फे ये शबनमी आँखे’, मराठमोळ्या मृणालच्या नैसर्गिक सौंदर्याचा कहर)

मजेंडा पार्टी साडी

मजेंडा पार्टी साडी

साडी कोणत्याही स्टाईलची असो सागरिका ती उत्तमरित्या कॅरी करते. मजेंडा रंगाची आणि त्यावर सिल्व्हर स्ट्रिप्स असणारी ही साडी पार्टी वेअर असून सागरिकाने यासह स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. त्यासह शाल घेतली असून पुन्हा एकदा रॉयल लुक दिला आहे. नेकलेस घालून आणि मोकळे केस सोडत सौंदर्यात भर पाडली आहे.

हेही वाचा :  माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

(वाचा – ‘मी भिजून पुरी आता झाले ओली’…अश्विनी कासारचा वेड लावणारा लुक, हिरव्यागार साडीतील फोटो तुफान व्हायरल)

sagarika ghatage (5)

sagarika-ghatage-5

पार्टी वेअर साडी

पार्टी वेअर साडी

नेट वर्क साडीची वेगळीच कमाल आहे. सागरिकाने नेसलेली ही नेट साडी पार्टासाठी उत्तम लुक ठरू शकते. यासह डिझाईनर ब्लाऊज घालून तुम्ही लुक पूर्ण करू शकता.

तुम्हीही कोणत्याही कार्यक्रमासाठी जाण्यासाठी साड्यांचा विचार करत असाल आणि रॉयल दिसायचे असेल तर सागरिकाच्या या लुकवरून नक्की प्रेरणा घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …