८ वर्षांपासून सिनेविश्वातून गायब आहे ही अभिनेत्री, तरीही देतेय रश्मिका मंदानाला टक्कर

मुंबई: सध्या देशभरात दाक्षिणात्य सिनेमांची विशेष चर्चा आहे. साऊथ सुपरस्टार्सनी गेल्या काही काळापासून लागोपाठ सुपरहिट चित्रपट केले आहेत. तामिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू अशा विविध भाषांधील सिनेमांना आता देशभरातून वाहवा मिळते आहे. दरम्यान तुम्हाला एकेकाळी मोठा पडदा गाजवणारी कन्नड अभिनेत्री ‘राम्या’ (Sandalwood Actress Ramya) आठवते आहे का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे या प्रसिद्ध सँडलवूड अभिनेत्रीने गेल्या ८ वर्षात एकही सिनेमा केलेला नाही. तरी देखील ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. राम्या पुनीत राजकुमारसह केलेल्या चित्रपटांमुळे विशेष चर्चेत असते.

हे वाचा-थोडक्यात वाचला मराठमोळ्या अभिनेत्रीच्या भावाचा जीव, अजूनही ताज्या आहेत आठवणी

कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट पाच अभिनेत्रींमध्ये एक नाव राम्याचे आहे. पहिल्या पाच अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदाना आणि राधिका पंडित यांचेही नाव आहे. राम्याने राजकारणात एंट्री घेतल्यानंतर तिने सिनेविश्वाकडे पाठ फिरवली, पण तिची चर्चा अजूनही होते.

मीडिया रिपोर्टनुसार, ऑर्मेक्सने प्रसिद्ध कलाकारांच्या बाबतीत एक सर्व्हे केला आहे. त्यामधील माहितीनुसार लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत राम्या चौथ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर ‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना, दुसऱ्या क्रमांकावर रचिता राम, तिसऱ्या क्रमांकावर राम्या आणि पाचव्या स्थानी अशिका रंगानाथ आहे. राम्याने चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे.

राम्या जरी सिने इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ४० वर्षीय ही अभिनेत्री तिच्या फिटनेसबाबत देखील जागरुक आहे. सोशल मीडियावर तिचे रील्स देखील व्हायरल होत असतात.

हे वाचा-रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर आदिनाथ कोठारे बोललाच, वाचा काय म्हणाला अभिनेता

राम्याचे खरे नाव दिव्या स्पंदना असून तिचा जन्म बँगलोरमधील आहे. उटीतील हिल्डा याठिकाणी तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असून बँगलोरच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. राम्यााला अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते, पण तिच्या वडिलांनी तिचे फोटोशूट करुन निर्मात्यांना पाठवले होते. त्यानंतर तिला सिनेमात ब्रेक मिळाला. कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारसह सिनेविश्वात पदार्पण केले. २००३ साली ‘अभी’ नावाच्या सिनेमातून तिने पुनीतसह पदार्पण केले होते. राम्याने कन्नड, तामिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेमातही काम केले आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

माफी मागूनही आमिरचं नशीब खराब; Laal Singh Chaddha चे तब्बल 1300 शो रद्द

मुंबई 12 ऑगस्ट: आमिर खानची मूखु भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा हा सिनेमा नुकताच प्रेक्षागृहात …

Laal Singh Chaddha विरोधात कोल्हापूरात भाजप हिंदुत्त्वादी संघटना आक्रमक

मुंबई, 12 ऑगस्ट : आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमाला गेल्या काही दिवसांपासून विरोध …