Video : रमा म्हणतेय, बाई ग कमालच झाली; तर आनंदी सांगतेय उघडलेल्या दाराची गोष्ट

मुंबई : झी मराठीवर दार उघड बये ही मालिका सुरू झालीय. संबळ वादन करणाऱ्या तरुणीवर ही मालिका बेतली आहे. आयुष्यात काही वेगळं करू पाहणाऱ्या तरुणीची ही गोष्ट आहे. त्यानिमित्तानं झी मराठीनं कलाकारांना दार उघड मुमेंट शेअर करायला सांगितली. म्हणजे तुमच्या आयुष्यात करियरची दारं कधी उघडली, यशाचा प्रवास कधी सुरू झाला ते सांगायचं.

यशनंतर समीरला मिळाला एक खास मित्र, हा Photo पाहा तर खरं!

नवा गडी नवं राज्य मालिकेतली रमा म्हणजेच अनिता दातेनं हे क्षण शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली, ‘ललित कला नाट्य केंद्रातून नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेऊन मी मुंबईत आले. अनेक दिग्गजांचं काम पहात होते. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते. पण मला हवं तसं काम मिळत नव्हतं. मग अथक परिश्रमानंतर अथर्व थिएटरचं ‘बाई ग कमाल झाली’ हे नाटक मला मिळालं. त्यानंतर सनई चौघडे सिनेमा. दारं उघडतच गेली.’ माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतली राधिका तर खूप लोकप्रिय होती, हे तर सगळ्यांना माहीत आहे.


त्यानंतर अनितानं नाॅमिनेट केलं आनंदीचं काम करणाऱ्या पल्लवी पाटीलला. मग पल्लवीनंहीदार उघड मुमेंट सांगितली. तिच्या करियरची सुरुवात आदित्य सरपोतदारच्या क्लासमेट सिनेमानं झाल्याचं शेअर केलं. सध्या नवा गडी नवं राज्य मालिकेतली पल्लवी साकारत असलेली आनंदी प्रेक्षकांना आवडतेय.


दार उघड बये या मालिकेत सानिया चौधरी मुख्य भूमिका साकारत आहे. नाटक, मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. दार उघड बये मालिकेत ती संबळ वादक दाखवली आहे. मंदिरात संबळ वाजवते. तिने या भूमिकेसाठी संबळ वादनाचं आवर्जून प्रशिक्षण घेतलं.

माझ्यातल्या प्रेक्षकालाही तितकीच उत्सुकता, सुबोध भावे स्वत:च्याच सिनेमाबद्दल म्हणतोय

बयो स्वतः सांगतेय, छोट्या बयोच्या मोठ्या स्वप्नाच्या शुटिंगची गोष्ट



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …