अभिनेत्री शिल्पा नवलकर यांचा निर्मात्यावर कथा चोरल्याचा आरोप

मुंबई, 19 सप्टेंबर : नुकतंच  मराठी चित्रपटसृष्टीत विविध चित्रपटांची घोषणा झाली आहे. यामध्ये मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित  ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आली आहे.  या चित्रपटाच्या माध्यमातून मृणाल कुलकर्णी 8 वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. तर  त्यांचा मुलगा आणि अभिनेता विराजस कुलकर्णी या चित्रपटाचा लेखक आहे. या चित्रपटात सई  ताम्हणकर, शिवानी रांगोळे  या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.  या सगळ्या गोष्टींमुळे चाहते खुश झालेले  असतानाच दुसरीकडे या चित्रपटामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी  त्यांच्या ‘सेल्फी’ या नाटकाची कथा चोरल्याचा आरोप या चित्रपटाच्या निर्मात्यांवर केला आहे. शिल्पा नवलकर यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट करत हे आरोप केले  आहेत.

या पोस्टमध्ये आपली बाजू मांडताना शिल्पा नवलकर यांनी सांगितलय कि, ‘त्यांच्या सेल्फी या नाटकाचा निर्माता परितोष पेंटर याने या नाटकावर चित्रपट करण्याचा हट्ट त्यांच्याकडे धरला होता. पण शिल्पा यांनी आधी नकार दिला होता. पण काही काळानंतर त्यांनी यासाठी होकार कळवला.’ त्या म्हणतात कि, ”आमचं दोघांचं बोलणं झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून मृणाल कुलकर्णीची निवड झाली. सहलेखकासाठी मी स्वतः विराजस कुलकर्णीचं नाव सुचवलं. तिसरी मीटिंग झाल्यानंतर कथा बांधायला सुरुवात करायची असं ठरलं. “पुढच्या आठवड्यात भेटूया” ह्या वाक्यानंतर मला परितोष पेंटर कडून एकही फोन आला नाही.”

हेही वाचा – Sai Tamhankar : बॉलिवूडच्या ‘सिरीयल किसर’ अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी सई; नाव ऐकूण तुम्हालाही वाटेल आश्चर्य
त्यांनी पुढे लिहिलंय कि, ”दोन दिवसांपूर्वी मला थेट परितोष पेंटर निर्मित मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित विराजस कुलकर्णी लिखित ‘फक्त महिलांसाठी पीएमएस’ नावाची फिल्म अनाउन्स झालेली दिसली. सेल्फी नाटकाचा मूळ गाभा हा आहे की पाच वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या महिला एका ट्रेन प्रवासासाठी भेटतात, एका अशा जागी अडकून पडतात जिथून त्यांना चटकन बाहेर पडता येत नाही आणि त्यानंतर त्यांचा एकत्र होणारा आंतरिक प्रवास… मृणालने काल दिलेल्या एका मुलाखतीत तिने चित्रपटाचा हाच गाभा सांगितला आहे.”

पुढे त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या, “त्याने मूळ नाटकाच्या लेखकाला कुठल्याही प्रकारचे क्रेडिट देणं किंवा हक्क विकत घेण्याचा विचार केला नाहीये. आता कथा वेगळी असली तरीही हा चित्रपट माझ्याबरोबर सुरू केला होता, त्यामुळे तो सेल्फी वरचाच आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे.”

शेवटी त्यांनी लिहिलं, “ज्या निर्मात्याने माझं सेल्फी हे मराठी नाटक त्याला प्रचंड आवडलं म्हणून इंग्रजी आणि हिंदी मध्ये produce केलं, तो जेव्हा हाच concept घेऊन चित्रपट करतो,तेव्हा मात्र तो विराजस कुलकर्णी ह्याचा ओरिजिनल concept आहे ह्यावर विश्वास कसा ठेवायचा?” शिल्पा नवलकर यांच्या या पोस्टला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत पाठिंबा दर्शवला आहे.

आता या सगळ्यावर मृणाल कुलकर्णी काय प्रतिक्रिया देतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous भर कोर्टासमोर गॅंगवॉर; साक्ष देण्यासाठी आलेल्या कुख्यात गुंडांची गोळ्या घालून हत्या

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …