केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर (Maharashtra State Road Transport Corporation Latur) अंतर्गत मॅकेनिकल मोटर व्हिकल, (Mechanic Motor Vehicle), इलेक्ट्रिशियन (Electrician), मॅकेनिक व्हिकल बॉडी बिल्डर (Mechanic Vehicle Body Builder), मॅकेनिकल इंजिनीअरिंग (Mechanical Engineering), ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग (Automobile Engineering) या पदांवर शिकाऊ उमेदवारांच्या एकूण ५२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी संबधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर यांनी दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थपना शाखा ) –४१३५२७ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ३१ जुलै २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या