शाहरुख पठाण, जवान आणि डंकी या तीन आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शाहरुखच्या डंकी चित्रपटातील अनेक गोष्टी अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहेत. डंकीची कथा काय असेल, यात शाहरुखचा लूक कसा असेल, शाहरुख खानसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री असेल, या सर्व गोष्टींविषयी प्रेक्षक आतुर आहेत. अशातच ‘डंकी’च्या सेटवरील एक फोटो व्हायरल झाला आहे. डंकीच्या सेटवरुन व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू दिसत आहे. त्यामुळे शाहरुखसोबत डंकीमध्ये तापसी दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा – Rashmika Mandanna:पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचली रश्मिका; लाल लेहेंग्यात चाहत्यांना केलं घायाळ
शाहरुख आणि तापसीच्या व्हायरल होणाऱ्या फोटो लंडनमधील आहे. त्यामुळे सध्या डंकीचं शुटिंग लंडनमध्ये सुरु असल्याचं समजतंय. मात्र व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे शाहरुख आणि तापसीचे चाहते मात्र खूश झाले आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी आणि शाहरुख तापसीच्या नव्या लुकसाठी चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, शाहरुख राजकुमार हिराणीसोबत डंकी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्या पठाण आणि जवान य चित्रपटांसाठीही प्रेक्षक वाट पाहत आहे. अभिनेत्री तापसी पन्नचाही आगामी चित्रपट ‘दोबारा’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हत्येचं गूढ सोडवण्यासाठी तापसी काय काय प्रयत्न करते हे या चित्रपटातून दिसणार आहे. दोबारामध्ये तापसी पुन्हा पावेल गुलाटीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या