‘दोन वर्ष त्याने सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं त्यामुळे..’;विकासने शेअर केला VIDEO

मुंबई, 6 सप्टेंबर: यंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्ट गणेश चतुर्थीपासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. सगळेजण या उत्साहात सहभागी होऊन जल्लोष साजरा करताना दिसत आहे. अनेक कलाकार गणेशाच्या दर्शनासाठी विविध ठिकाणी हजेरी लावत आहेत. फोटो शेअर करत गणेशोत्सवाचे अनुभव, जुन्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत. अशातच अभिनेता विकास पाटील यानीही गणेशोत्सवाचा खास व्हिडीओ शेअर केलेला पहायला मिळाला.

विकास पाटील यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचा आहे. त्यानं या व्हिडीओसोबत भावनिक कॅप्शनही दिल्याचं पहायला मिळालं. विकास म्हणाला, ‘मुंबईत आल्यापासून राजाचं दर्शन कधी चुकलं नाही, त्याने चुकवू दिलं नाही. गेली दोन वर्ष त्याने सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं त्यामुळे या वर्षी भेटीची ओढ तिप्पट वाढली होती .. ती सगळी कसर या भेटीत भरून निघाली. यथेच्छ दर्शन झालं. त्या साठी लालबागच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार’.

विकासनं पोस्टच्या शेवटी म्हटलं की, ‘बाप्पा अशीच कृपा माझ्या कुटुंबावर आणि मित्रमंडाळीवर राहूदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना’. त्याच्या या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधलं असून विशेषतः त्याच्या कॅप्शननं अनेकांचं मन जिंकलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरुन कमेटं येत आहेत. लाईक्स आणि कमेंटचाही भरभरुन वर्षाव होत आहे.

हेही वाचा –  Raju Srivastav यांच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर, शरीरात जाणवली हालचाल

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला विकास पाटील आता ‘सुख म्हणजे काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Scholarships for OBC: ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

Check Also

विवेक अग्निहोत्रींचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले ‘बॉयकॉट संस्कृती चांगलीच’

मुंबई, 17 सप्टेंबर :  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून  बॉलिवूडवर जोरदार टीका होत आहे. कोणताही …

बच्चन कुटुंबाच्या 3 पिढ्या येणार एकत्र; बिग बींची नात करणार कुटुंबाची पोलखोल

मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांच्याविषयी …