अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता नितीश चव्हाण या दोघांचं एक रोमॅन्टिक अंदाजातील रील व्हायरल होत आहे. नुकतंच दोघांचं ‘तुला पाहुन’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्यावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘तुला पाहुन याडं लागलं…’. त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.
हेही वाचा – Hruta Durgule: महाराष्ट्राच्या क्रशचा असाही अवतार; Timepass 3 मधली हृताची कडक गाणी पाहिलीत का?
नितीश आणि सायलीच्या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दर्शवला. नितीश आणि सायलीचा गोड अंदाज या गाण्यातून पहायला मिळाला. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या गाण्यावर अनेक रीलही बनवले जात असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, 68 व्या राष्ट्रीय पुरस्काराची नुकतीच काही दिवसांआधी घोषणा करण्यात आली. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘गोष्ट एका पैठणीची’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीवनं प्रमुख भूमिका साकारलेली. या चित्रपटाला पुरस्कार जाहीर होताच संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी इत्यादी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे यांनी या चित्रपटाची निर्मीती केलेली पहायला मिळाली.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.