रत्ना पाठक यांनी महिलांच्या उपास-तापास, व्रतवैकल्यांवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. रत्ना पाठक यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. तर त्यांनी देशातील हिंदू महिलांची माफी मागावी, अशी मागणी होत आहे.
काय म्हणाल्या रत्ना पाठक?
एका मुलाखतीत रत्ना पाठक यांना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीतुम्ही (करवा चौथ) उपवास करता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी ‘मी काय वेडी आहे का, असे उपवास करायला? असं उत्तर दिलं. त्या इथेच थांबल्या नाहीत. यावर बोलताना त्या पुढं म्हणाल्या की, आश्चर्य वाटतं की, आज शिकलेल्या महिलाही पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपास-तापास करतात. आपल्या देशात विधवा महिलांच्या वाट्याला भयाण आयुष्य येतं. त्यामुळं या भीतीपोटी महिला असे उपवास करतात. २१ व्या शतकातही आपण याबद्दल चर्चा करतो यापेक्षा मोठं दूर्दैव नाही, असं रत्ना पाठक म्हणाल्या.
रत्ना यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकराली होती. या चित्रपटात त्यांनी रणवीरच्या आईची भूमिकेत दिसल्या होत्या.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या