मिलिंद सोमणने १०० फूट खोल समुद्रात पत्नीसह मारली उडी, पाण्यातही अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि सुपरमॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय आहे, याशिवाय तो अनेक मुद्द्यांवर त्याचं स्पष्ट मत मांडतो. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कोंवरसह अनेकदा खुलेपणाने रोमान्सही करताना दिसतो. सध्या हे कपल इजिप्तमध्ये सुट्टी एंजॉय करत असून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहेत. अलीकडेच या दोघांचा १०० फूट खोल पाण्यातील एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे.


मिलिंद आणि अंकिता यांनी त्यांच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान या जोडीने नुककाच स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतला. ज्यामध्ये त्यांनी १०० फूट पाण्यात खोल जाऊन स्कूबा डायव्हिंग केलं. मिलिंद आणि अंकिता यांनी पाण्यामध्ये हाताने हृदय बनवल्याची कृती करत त्यांचा रोमँटिक पोज दिली आहे. ‘एकमेकांसह अधिकतर गोष्टी एक्सप्लोअर करा’ असं कॅप्शन देत या लोकप्रिय कपलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.


मिलिंदप्रमाणेच अंकिताही तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा दोघे विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये एकत्र धावताना दिसतात. पण सध्या इजिप्तमध्ये हे कपल शांततेत वेळ घालवाता दिसतायंत, पण त्याबरोबर स्कूबा डायव्हिंगसारखं साहसही या कपलने करून पाहिलं.


बॉलिवूडच्या या पॉवर कपलने 2018 मध्ये लग्न केलं. दोघांनाही त्यांच्या वयातील अंतरासाठी अनेकदा ट्रोल केलं गेलं, पण तरीही हे कपल अनेकांचे आवडते आहे. मिलिंदचे वय 56 असून अंकिता केवळ 30 वर्षांची आहे. दोघांच्या वयात २६ वर्षांचा फरक आहे. याच कारणामुळे लोक त्यांना अनेकदा टोमणे मारताना दिसतात. पण याकडे दूर्लक्ष करत अनेकदा हे कपल रोमँटिक अंदाजात फोटो पोस्ट करत असतं.

हे वाचा-हाय स्लिट ड्रेसमध्ये स्टनिंग अंदाज, वयाच्या ४० व्या वर्षीही तितकीच बोल्ड आहे अभिनेत्री

मिलिंद एक अभिनेता, सुपरमॉडेल आणि चित्रपट निर्मातादेखील आहे. तो फिटनेस फ्रीक असून अंकिताही फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. 1995 मध्ये तो ‘मेड इन इंडिया’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता. मिलिंदने ९० च्या दशकातच आपल्या फिट बॉडीने प्रेक्षकांची मनं जिंकली, आज इतक्या वर्षांनीही त्याचा फिटनेस कायम आहे.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Laal Singh Chaddha विरोधात कोल्हापूरात भाजप हिंदुत्त्वादी संघटना आक्रमक

मुंबई, 12 ऑगस्ट : आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमाला गेल्या काही दिवसांपासून विरोध …

बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी मिळून महाराष्ट्र …