Tujha Laal Dupatta : ‘मिलिनिअर प्रशांत नाकती’ यांच्या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या नावासारखंच संपूर्ण महाराष्ट्राला मराठी गाण्यांच्या माध्यमातून ‘नादखुळा’ केलं आहे. प्रशांत नाकती यांना संगीत विश्वातील ‘मिलिनिअर’ असे म्हटले जाते. लवकरच प्रशांत नाकती ‘तुझा लाल दुपट्टा’ (Tujha Laal Dupatta) हे रोमॅंटिक गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘नादखुळा म्युझिक’ युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘तुझा लाल दुपट्टा’
निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित ‘तुझा लाल दुपट्टा’ हे नवीन रोमँटिक गाणं लवकरच ‘नादखुळा म्युझिक’ या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. बऱ्याच कारणांमुळे हे गाणं खास आहे. त्यातील पहिलं कारण म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडचा गायक नकाश अजीज आणि प्रशांत नाकती पहिल्यांदा एकत्र आले आहेत. नकाश अजीजने हे गाणं गायले असून त्याला साथ दिली आहे मोस्ट पॉप्युलर, जिचा आवाज सतत कानावर पडत राहावा असं वाटतं, जिचे सूर थेट मनाला भिडतात अशी गायिका सोनाली सोनावणेने. आणखी विशेष कारण असं की या गाण्यात युथ स्टार निक शिंदे आणि ‘बनी’ उर्फ तृप्ती राणे ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. हे गाणं अगदी रोमँटिक, प्रेमळ असं आहे ज्यात प्रेमाच्या भावना आहेत, सुंदर असा डान्स आहे आणि जोडीला बॉलिवूडचा फिल देणारे व्हाईब्स आहेत.
‘तुझा लाल दुपट्टा’ हे गाणं देखील मॅजिकलच असणार कारण या गाण्याचे बोल प्रशांत यांनी लिहिले असून संगीतही त्यांनीच दिले आहे. प्रशांत नाकती यांची गाणी जशी ऐकण्यास खूप छान वाटतात, तशीच तिला पाहण्यात देखील एक वेगळीच मजा असते. नाशिकमध्ये शूट झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केलं आहे.
गेले कित्येक वर्षांच्या मिलिअनच्या परंपरेनुसार यंदाच्या वर्षीचं ‘तुझा लाल दुपट्टा’ हे गाणं पण मिलिअन पटीने वाजणार आणि गाजणार सुध्दा याची खात्री आहे. मिलिनिअर प्रशांत नाकतीचे चाहते सध्या ‘तुझा लाल दुपट्टा’ या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Santosh Juvekar : संतोष जुवेकरने उघडली अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा; विद्यार्थ्यांना देणार अभिनयाचे धडे
Kon Honar Crorepati : वैदर्भीय बोलीभाषेतून धडे देणारे कराळे गुरुजी येणार ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या