मीरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. तिच्या या नव्या हटके व्हिडीओने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मीराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती रिक्षाने प्रवास करत आहे. यावेळी तिने रस्त्यांवरील खड्ड्यांची झलक दाखवली आहे. या व्हिडीओला ‘बाबूजी जरा धीरे चलो’ हे गाणं लावत ‘डोळे बंद करा आणि रोलर कोस्टरचा आनंद घ्या’, असं मीरानं म्हटलं आहे.
मीराने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडीओवर भन्नाच कमेंट करत आहेत. ‘अरेरे, मी पण फील केलं हे, बाबुजी अनस्टॉपेबल, कमाल, नवीन रस्ता शोधा, वा काय ते रस्ते … काय ते खडे एकदम ओके’, अशा अनेक कमेंट मीराच्या या व्हिडीओवर पहायला मिळत आहे.
हेही वाचा – एकेकाळची मालिकेची नायिका आता करतेय साइड रोल; ओळखलं का मराठमोळ्या अभिनेत्रीला?
दरम्यान, बिग बॉस 3 शोमध्ये मीरा जगन्नाथ विजेती झाली नसली तरी तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या शोमध्ये पुष्कर जोगसोबतच्या तिच्या खास मैत्रीचे अनेक किस्से रंगले. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही मीरचे अनेक नवे प्रोजेक्ट पहायला मिळाले.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या