Kaun Pravin Tambe Trailer Out : बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवण्यात येत आहेत. महेंद्रसिंह धोनी, कपिल देवनंतर आता प्रवीण तांबेचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) असे या सिनेमाचा नाव आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘कौन प्रवीण तांबे’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षणीय आहे. ट्रेलरमध्ये श्रेयस तळपदे (Shreyas Talapade) गोलंदाजी करताना दिसत आहे. प्रवीण तांबेने त्याचे स्वप्न कसे साकारले ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ या सिनेमाचे दिग्दर्शन जयप्रदा देसाई यांनी केले आहे.
View this post on Instagram
श्रेयस तळपदेशिवाय ‘कौन प्रवीण तांबे’ सिनेमात आशिष विद्यार्थी, परमब्रत चॅटर्जी आणि अंजली पाटील हे कलाकारदेखील दिसणार आहेत. हा सिनेमा 1 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Short Movies : डिज्नी प्लस हॉस्टारवर मनोरंजनाची मेजवानी; एकही रूपया खर्च न करता पाहा या शॉर्ट फिल्म्स
Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांचं ‘राष्ट्राय स्वाहा’ हे नवं यू ट्यूब चॅनेल प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती…
Riteish Deshmukh On Jhund : रितेश देशमुखनं झुंडचं केलं कौतुक; म्हाणाला, ‘नागराज मंजुळे हा देशातील…’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या