Tag Archives: Marathi News

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचा फोन, 2 दिवसांपुर्वीच केलं होतं सूचक ट्वीट

Jitendra Awhad: राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी कॉँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विरोधी गटाकडून अनेकदा धमकी येत असते. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आव्हाडांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समोर आले.  यानंतर एकच खळबळ उडाली. काय घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात एक …

Read More »

‘झुमका वाली पोर’ फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही काळापासून अहिराणी गाण्यांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. त्यातीतलच झुमका वाली पोर हे गाणं अनेकांच्या तोंडी ऐकू येत असेल. या गाण्यावर इन्स्टा रिल्स आणि काही व्हिडीओ देखील तयार करण्यात आले आहेत. मात्र आता हे गाणं तयार करणाऱ्या निर्माता विनोद कुमावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुमका वाली पोर गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या विनोद …

Read More »

भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर….

Meenakshi Lekhi : वारंवार विनंती करूनही ‘भारत माता की जय’चा न म्हटल्याने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केरळमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी शनिवारी केरळमधील कोझिकोड येथे झालेल्या युवा परिषदेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देत नसल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांवर केंद्रीय मंत्री लेखी संतापल्या. त्यांनी एका मुलीला घोषणा देत नसल्यामुळे रागाने बाहेर जाण्यास सांगितले. …

Read More »

‘ही वस्तुस्थिती आहे की…’; छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

Chhagan Bhujbal Resignation : ओबीसी मेळाव्याआधीच 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना भुजबळांनी नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. भुजबळ यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता छगन भुजबळांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय …

Read More »

सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान- शरद पवार

Sharad Pawar: सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. प्रताप पवार यांनी लिहिलेल्या ‘अनुभवे आले’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. याठिकाणी माझं वय 85 सांगितलं गेलं. मी प्रत्यक्षात 84 वर्षांचा आहे. माझं वय विनाकारण एक वर्षाने वाढवण्यात आलं, अशी फटकेबाजी …

Read More »

पेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, ‘तुमचे आवडते अ‍ॅप…’

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: आरबीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेत 31 जानेवारी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पेटीएमच्या सेवा स्थगित केल्या. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला पेटीएम वॉलेटमध्ये पैसै टाकता येणार नाहीत. पेटीएमच्या ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नयेत, त्यांना माहिती मिळावी यासाठी कंपनीने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.  पेटीएमचे संस्थापक आणि …

Read More »

विमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, ‘तसा काही…’

USA Dr. Sudipta Mohanty : अमेरिकेत विमानामध्ये हस्तमैथून करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय वंशाचे डॉक्टरबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत विमानामध्ये मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा भारतीय वंशाच्या डॉक्टरवरचा आरोप खोटा ठरला आहे. या प्रकरणात, भारतीय वंशाचे डॉक्टर विमानात एका किशोरवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोषी आढळले नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे. 33 वर्षीय डॉक्टर सुदिप्ता …

Read More »

मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला …

Read More »

‘हा’ आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम

Travel News : फिरस्त्यांच्या अर्थात पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांच्या यादीमध्ये काही ठिकाणांचा उल्लेख हमखास असतो. अशाच काही ठिकाणांच्या यादीमध्ये हिमाचल प्रदेश, लेह लडाखचा उल्लेख अग्रस्थानावर पाहायला मिळतो. तुम्ही कधी या ठिकाणांना भेट दिली आहे का? दिली असेल तर उत्तम आणि नसेल दिली तर या कमाल ठिकाणांविषयीची एक अतिशय रंजक माहिती पाहूनच घ्या. कारण, बाईकर्स असो किंवा मग रोड ट्रीपचं वेड …

Read More »

Video: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : भरधाव वाहनांमुळे अनेक अपघाच्या घटना रोज समोर येत असतात. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व देखील येतं. अशातच पुण्यातून अपघाताची अशीच एक भीषण घटना समोर आली आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक अपघाताची घटना एका …

Read More »

भाजपामध्ये जाणार का? छगन भुजबळ थेट म्हणाले, ‘माझी काही घुसमट…’

Anjali Damania On Chhagan Bhujbal: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु मराठा आरक्षणाला काही ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यातच आता भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या चर्चांना उधाण आलं आहे ते सामाजिक …

Read More »

सुट्टी संपवून परतलेल्या जवानाला पहिल्याच दिवशी वीरमरण; नाशिकच्या सुपुत्राचा लडाखमध्ये मृत्यू

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या मांडवड गावातील भारतीय सैन्यातील एका जवानाला लडाखमध्ये वीरमरण आलं आहे. कर्तव्यावर असताना नाशिकचा हा सुपुत्र शहीद झाला आहे. नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप भाऊसाहेब मोहीते (33) यांस लेह येथे वीरमरण आले. जवान संदीप मोहितेंचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संदीप मोहितेंच्या निधनाने नाशिकवर शोककळा पसरली आहे. भारतीय लष्करातील लेह …

Read More »

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची मोठी भूमिका

Maratha Reservation News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक घडामोडी सुरु असतानाच आता मराठा आरक्षण सर्वेक्षणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सरकारनं मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे.  राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 2 कोटी 12 लाखांहून अधिक …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अपघात; नागरिकांना ज्वलनशील वस्तूचा वापर न करण्याच्या सूचना

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात मोठा अपघात झाला आहे. गॅसने भरलेल्या टॅंकरचा अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरु केली आहे. दरम्यान या परिसरातील नागरिकांना देखील प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या असून त्याचे पालन करण्यास सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक भागात एका टँकरचा अपघात …

Read More »

निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान… एक नजर त्यांच्या कारकिर्दीवर!

Kolhapur News : पुरस्कार म्हणजे कामाची पोचपावती आणि पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप. असाच एक मानाचा पुरस्कार निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आला. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने महागौरव 2024 हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान …

Read More »

Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली

Gold Silver Price on 31 January 2024 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 64 हजार 420 रुपये इतका भाव नोंदवला गेला. तर एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.  दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे परिणाम …

Read More »

कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: नवरा-बायकोतील भांडणे ही नेहमी होतच असतात. प्रत्येक घरात भांड्याला भांड हे लागतच असते. मात्र कधी कधी पती पत्नीचे वाद हे इतके विकोपाला जातात की काहीतरी भयंकर घडते. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. पती-पत्नीच्या वादानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.  पती आणि पत्नीच्या वादानंतर पत्नीने रागाच्या घरात पतीच संपूर्ण घरच पेटवून …

Read More »

…तर काढता येणार नाहीत पेन्शनचे पैसे; 1 फेब्रुवारीपासून बदलणार तुमच्या पेन्शनसंदर्भातील नियम!

NPS Partial Withdrawal: कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑफिसमधून पीएफ कापला केला जातो. पण ज्यांचा पीएफ पगारातून कापला जात नाही ते नॅशनल पेन्शन स्किमचा पर्याय निवडतात. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक लॉंग टर्म गुंतवणूक आहे. यासंदर्भात पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने यासंदर्भात एक महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएससंदर्भात एक नवा नियम लागू होणार आहे. एनपीएस …

Read More »

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

New India Assurance Job: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड बंपर भरती सुरु आहे. या अंतर्गत उमेदवारांना चांगला पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.एनआयएआरच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत असिस्टंट पदांच्या …

Read More »

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार ‘ही’ चाल

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 56 जागांसाठी 16 राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांचं भवितव्य ठरणार आहे. 6 पैकी 5 जागा काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान हे खुल असल्याने यात राज्यात पक्षादेश म्हणजे …

Read More »