Tag Archives: bollywood

‘केजीएफ चॅप्टर 2’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘तुफान’ पाहून वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

KGF Chapter 2 : साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘रॉकिंग स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता यशची (Yash) फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. या अभिनेत्याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ आहे, याचा अंदाज त्याच्या KGF 2 चित्रपटाच्या सोशल मीडियावरील ट्रेंडवरून लावता येतो. लोक त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी यशच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. KGF 2 मधील ‘तूफान’ (Toofan) हे …

Read More »

एक विमान, खराब हवामान आणि अचानक लँडिंग! अजय देवगणच्या ‘Runway 34’चा ट्रेलर पाहिलात?

Runway 34 Trailer: अजय देवगण (Ajay Devgn), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचा आगामी चित्रपट ‘रनवे 34’ चा (Runway 34) ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकारांपासून ते निर्मात्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून ट्रेलर रिलीजची माहिती शेअर करत प्रेक्षकांना सरप्राईज दिले आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. त्याचबरोबर अजय देवगण यातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण …

Read More »

Sonam Kapoor : ‘हा अनुभव खूप खास…’, अनुष्का शर्माकडून सोनम कपूरला ‘मातृत्वा’च्या शुभेच्छा!

Sonam Kapoor Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने नुकतीच तिच्या ‘मातृत्वा’ची घोषणा केली. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा (Anand Ahuja) यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपण आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. या पोस्टनंतर सोनम कपूर आणि आनंद आहुजावर आनंदाचा वर्षाव होत आहे. आई होणाऱ्या सोनमवर चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ने मोडले अनेक रेकॉर्ड, 10व्या दिवसाची कमाई पाहिलीत?

The Kashmir Files: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची क्रेझ दुसऱ्या आठवड्यातही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. इतकंच नाही, तर सध्या देश-विदेशात फक्त ‘द कश्मीर फाइल्स’चीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर सलग दुसरा आठवडा टिकून राहणे …

Read More »

कुणी तरी येणार गं…. सोनम कपूर-आनंद आहुजाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Sonam Kapoor Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ही आनंदाची बातमी शेअर करताना सोनमने पती आनंद आहुजासोबतचे (Anand Ahuja) काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हे फोटो शेअर करत सोनमने प्रेग्नेंसीची घोषणाही केली आहे. हे फोटो शेअर करत सोनमने कॅप्शन लिहिले …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’वर आमिर खानची प्रतिक्रिया, म्हणाला ‘प्रत्येक भारतीयाने…’

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. कश्मीर फाइल्स एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. या चित्रपटाला जगभरातून खूप पसंती दिली जात आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील …

Read More »

जन्माच्या वेळी दुसऱ्या बाळासोबत झाली होती राणीची अदला बदल! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?

Rani Mukerji : अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आज (21 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी राणीची जन्माच्या वेळी चक्क एका दुसऱ्याच बाळासोबत बदली झाली होती. स्वतः अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. राणीचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला तिथे एक पंजाबी कुटुंब देखील होतं. याच कुटुंबातील बाळासोबत राणीची अदलाबदल झाली होती. …

Read More »

Kareena Kapoor : करीना कपूरने शेअर केले मालदीवमधील फोटो, थ्रो बॅक फोटो व्हायरल

Kareena Kapoor Maldives Vacation : अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा ग्रुप फोटो मालदीवमधील सुट्टीतील आहे. दोन्ही बहिणी आता सुट्टीवरून मुंबईत परतल्या आहेत. करीना आणि करिश्माने मालदीव ट्रिपदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असले तरी, करीनाने एका लास्ट फोटो शेअर करत ट्रिप संपल्याचं म्हटले आहे. करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये …

Read More »

सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं… | ankita lokhande seen raging on her husband vicky jain in holi party calm her down video going viral

अंकिता आणि विकी जैनसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अंकिता पती विकी जैनसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. लग्नानंतरची त्या दोघांची ही पहिली होती. त्यामुळे त्या …

Read More »

Govinda : सुपरस्टार गोविंदा लवकरच करणार ओटीटीवर पदार्पण

Govinda : बॉलिवूड अभिनेता ‘गोविंदा’ (Govinda) गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. 90 च्या दशकात गोविंदाने रुपेरी पडद्यावर राज्य केले. 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे. गोविंदादेखील लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.  झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला,”ओटीटी हे कलाकारांसाठीचे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म  एक्सप्लोर करायला मला आवडेल. नुकताच गोविंदा करिश्मा कपूरसोबत …

Read More »

World Tv Premiere : ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

World Tv Premiere : 2021 मध्ये ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’ हे बिग बजेट सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.  ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’ हे दोन्ही सिनेमे सिनेमागृहात आमने-सामने होते. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांत चुरशीची स्पर्धा होती. ‘पुष्पा- …

Read More »

Happy Birthday Alka Yagnik : गायिका अलका याज्ञिक लग्न होऊनही पतीपासून 27 वर्षे दूर, ‘हे’ आहे का

Happy Birthday Alka Yagnik : आपल्या सुरेल आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांचा आज 56 वा वाढदिवस साजरा आहे. अलका याज्ञिक यांनी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गाणी आपल्या आवाजात दिली आहेत. अलका यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे झाला, आज जगभरात त्यांचे चाहते आहेत. अलका या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, त्यामुळे तिने …

Read More »

पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळलं तेव्हा…

Pankaj Tripathi : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. पंकज त्रिपाठी यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या मेहनतीने आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठीने ओटीटीवरही स्वतःची छाप सोडली आहे. आज आम्ही तुमच्यासोबत या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला. त्यांनी स्वतःबद्दल आणि पत्नी मृदुलाबद्दल बोलताना …

Read More »

पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी, आता केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी

Bhavana Menon : अभिनेत्री भावना मेनन (Bhavana Menon) नुकतीच केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) दिसून आली आहे. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. केरळ राज्याच्या चालचित्र अकादमीचे अध्यक्ष रंजीत यांनी ‘शक्तीचे प्रतीक’ म्हणत भावनाला प्रेक्षकांसमोर आणले.  मल्याळम अभिनेत्री भावना मेनन पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी पडली होती. याप्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपवर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी 10 पैकी सात लोकांना अटकदेखील …

Read More »

Anushka Sharma Production House : अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) एक मोठा निर्णय घेतला आहे. 2013 साली अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Filmz) नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशसोबत हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. पण आता अनुष्काने या प्रॉडक्शन हाऊसला रामराम केला आहे. अनुष्काने प्रॉडक्शन हाऊसला नुकताच रामराम केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती …

Read More »

Alia Bhatt Upcoming Films :’गंगूबाई काठियावाडी’नंतर आलियाचे पाच बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

Alia Bhatt Upcoming Films : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) सिनेमा नेहमीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. नुकताच आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्येदेखील समावेश केला आहे. लवकरच आलियाचे आणखी पाच सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.  आरआरआर ( RRR) : आलिया भट्टचा ‘आरआरआर’ हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या …

Read More »

RRR : ‘आरआरआर’ सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

<p><strong>RRR Ticket Price: :</strong> बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘आरआरआर’ हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असल्याने निर्मात्यांनी निर्मात्यांनी सरकारला तिकीट दरात वाढ करण्याचे आवाहन केले आहे.</p> <p>’आरआरआर’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाला 400 कोटींचे बजेट लागले आहे. त्यामुळेच या सिनेमाचे तिकीटदेखील महागणार आहे. ‘आरआरआर’ …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित’द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला भाजपचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. या सिनेमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. हा सिनेमा भाजपच्या काही राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. तर कुठे सिनेमा पाहण्यासाठी कामगारांना रजा देण्यात आली …

Read More »

KGF 2 Toofan : सुपरस्टार यशच्या KGF 2 सिनेमातील Toofan गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

KGF 2 : बहुप्रतिक्षित ‘KGF 2’ हा सिनेमा 14 एप्रिल रोजी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील ‘तुफान’ हे पहिले गाणे 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर 27 मार्चला केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. KGF 2 हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.  फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter …

Read More »

Holi 2022 : करीना कपूर खानपासून मौनी रॉयपर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी धुमधडाक्यात साजरी केली होळी

Holi 2022 : आज देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  मौनी रॉयमौनी रॉयने तिचा पती सूरज नांबियारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे,”तुमचे जीवन नेहमी आनंदाच्या रंगांनी भरले जावो, होळीच्या शुभेच्छा”. …

Read More »