स्टडीमध्ये खुलासा – घोरणा-या लोकांना आहे Cancer चा सर्वात जास्त धोका

अति थकव्यामुळे कधी कधी गाढ झोप लागते आणि नाकातून घर्रघर्र आवाज येऊ लागतो. ही एक सामान्य स्थिती आहे. पण काही लोकांमध्ये ही समस्या सतत व रोज सुरू असते. झोपताना नाकातून आवाज येत असेल अर्थात तुम्ही घोरत असाल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा घोरणाऱ्या लोकांना त्यांच्या स्थितीची जाणीवही नसते. पण सोबत झोपलेल्याला मात्र त्याचा खूप त्रास होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की, जे लोक घोरतात त्यांना कॅन्सरचा धोका जास्त असतो.

झोपेत असताना वायू किंवा श्वसन मार्गात अडथळा आल्याने घोरणे सुरू होते. हा एक झोपेचा आजार आहे ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) असे म्हणतात. संशोधकांना असे आढळून आले आहे की, झोपेचा विकार असलेल्या लोकांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असतो, जी एक जीवघेणी स्थिती असू शकते.

घोरण्याची कारणे

तुमच्याही मनात हा प्रश्न आलाच असेल की नक्की घोरण्यामागची कारणे काय आहेत. म्हणजे ही समस्या सुरू तरी कशी होते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या या समस्येचे मुळ मानल्या जातात. चला याची देखील माहिती घेऊया. तर

  1. लठ्ठपणा
  2. सर्दी
  3. अॅलर्जी
  4. झोपण्यापूर्वी मद्यपान करणे
  5. टॉन्सिल
  6. एडेनोइड्स वाढणे
  7. झोपण्याची स्थिती
  8. नाकाशी निगडीत समस्या
  9. पुरेशी झोप न घेणे यांसारखी कारणे घोरण्याला कारणीभूत असतात.
हेही वाचा :  'ऑपरेशन मार्वल': अ‍ॅव्हेंजर्स बनून पोलिसांनी केली ड्रग्ज तस्करांना अटक; पाहा Video

NCBI च्या मते, घोरणे स्ट्रोकचा धोका 46 टक्क्यांनी वाढवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत घोरणे ही वाईट सवयीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. हे धमनीच्या नुकसानीचे लक्षण देखील असू शकते तर वेबमेडच्या मते, जे लोक झोपताना घोरतात किंवा ज्यांना श्वासोच्छवासाच्या इतर समस्या आहेत, त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. तसेच तुम्ही जितके लहान आहात तितका धोका जास्त आहे. त्यामुळे घोरण्याची सवय असेल तर लगेचच त्यावर उपचार घ्या.

(वाचा :- मॅच दरम्यान स्टार फुटबॉलरचं हृदय पडलं अचानक बंद, या भयंकर आजाराचं दिसत नाही एकही लक्षण, 6 गोष्टींपासून रहा दूर)

पेपरमिंट ऑईल

पेपरमिंट ऑईलं मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे तुमचे नाक आणि श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करू शकतात. घोरणे आणि सौम्य स्लीप एपनियाशी संबंधित लक्षणे कमी करण्यास देखील यामुळे मदत होते. यासाठी पेपरमिंट ऑइलचे काही थेंब पाण्यात मिसळा आणि झोपण्यापूर्वी या पाण्याने गुळण्या नक्की करा.

(वाचा :- कॅन्सर, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधाने तडपवून मारतो सकाळ-सायंकाळ घेतला जाणारा हा पदार्थ, आजच बंद करा)

काळीमिरी

काळीमिरी ब्लॉक झालेले नाक उघडण्यास मदत करते, जे घोरण्याचे प्रमुख कारण आहे. काळीमिरी, वेलची, जिरे आणि दालचिनी समान प्रमाणात घेऊन बारीक वाटून घ्या. या पावडरचा दिवसातून अनेक वेळा वास घेतल्याने घोरण्यापासून आराम मिळतो.

हेही वाचा :  छातीत बलगम जमा झाल्यास योगासन करा, घाण मुळापासून जाईल निघून, ३ लोकांनी मात्र ही गोष्ट टाळा

(वाचा :- वेटलॉस, पोट साफ न होणं, डायबिटीज, बॉडी डिटॉक्स, डायजेशनच्या समस्या होतील दूर, खा हा 1 पदार्थ)

ऑलीव्ह ऑईल

झोपण्यापूर्वी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब प्यायल्याने घोरण्यापासून आराम मिळू शकतो. हे तेल वायू किंवा श्वसन मार्गाला सुरळीत करते आणि त्यातला अडथळा दूर करण्यास मदत करते. यासोबतच, तुम्ही झोपता तेव्हा घशाच्या स्नायूंना घशात अडथळा आणण्यापासून देखील ते रोखते.

(वाचा :- Sleeping Tips: रात्री 10 नंतर अजिबात करू नका ही 5 कामे, विळख्यात ओढतील हार्ट अटॅक व स्ट्रोकसारखे गंभीर आजार)

ओवा

वाफेच्या स्वरूपात ओवा घेतल्याने साचलेला कफ किंवा नाकात काहीही अडथळा असल्यास तो दूर होण्यास मोठी मदत होते. अशा परिस्थितीत नाक बंद झाल्यामुळे घोरण्याचा जो आवाज येतो त्यापासून आराम मिळू शकतो. हा उपाय करण्यासाठी ओवा घ्या आणि बारीक करा. हा बारीक केलेला ओवा कापडात बांधून वास घ्या. याशिवाय तुम्ही झोपण्यापूर्वी उकळत्या पाण्यात ओवा टाकून वाफ सुद्धा घेऊ शकता.

(वाचा :- थंडीचा परिणाम समजून घसादुखीला घेऊ नका हलक्यात, असू शकतो Tonsil Cancer, पहिल्या पायरीत दिसतात ही 9 भयंकर लक्षणं)

हेही वाचा :  'संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण...'; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

एका कुशीवर झोपा

जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीवर झोपता तेव्हा घोरण्याची शक्यता जास्त असते. यामुळे जीभ घशाच्या मागील बाजूस वळते आणि, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते आणि यातूनच घोरण्यासारखा आवाज येतो. अशा परिस्थितीत घोरणे थांबवण्यासाठी एका बाजूला झोपण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा :- भारतीय क्रिकेटपटूंची अग्नीपरीक्षा आहे BCCI ची Dexa Test, यामध्ये बाहेर पडणार खेळाडूंचे अनेक सिक्रेट्स, पण कसे?)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती …

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …