‘ऑपरेशन मार्वल’: अ‍ॅव्हेंजर्स बनून पोलिसांनी केली ड्रग्ज तस्करांना अटक; पाहा Video

Operation Marvel : दक्षिण कोरियात (south korea) हॅलोविन पार्टीदरम्यान (Halloween Party) झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) 151 पेक्षाही अधिकांचा मृत्य झाला. तर शेकडो लोक जखमी झाले. या घटनेनंतर 50 हून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका ( cardiac arrest) आला होता. अनेक लोक रस्त्यावर पडून होते. पोलीस रस्त्यावरील लोकांना सीपीआर (CPR) देताना दिसले. एका प्रकारच्या ड्रग्जच्या (drugs) वापरामुळे ही चेंगराचेंगरी झाली अशीही माहिती या दुर्घटननेंतर समोर आली होती. या घटनेनंतर आता जगभरातील पोलीस सक्रिय झाले होते. 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या हॅलोविन पार्टींवर पोलिसांनी करडी नजर होती. एका हॅलोविन पार्टीतही पोलिसांनी कारवाई करत मोठं ड्रग्ज रॅकेट उधळलं. पण पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वत्रच चर्चा सुरुय. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने ड्रग्ज (drug) विक्रेत्यांना अटक केलीय ते पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलय. (Operation Marvel Police turn Avengers and arrest drug trafficker)

मार्वलमधील थॉर (thor), कॅप्टन अमेरिका (captain america) किंवा स्पायडर मॅन (Spider-Man) हे सुपरहिरो (superhero) पडद्यावर वाईटाचा नाश करण्यासाठी ओळखले जातात. अनेक जण त्यांना नायक म्हणून पाहतात. परदेशात याची फारच क्रेझ असल्याचा पाहायला मिळतं. आता पोलिसांनाही (Police) या सुपरहिरोंचे वेड लागलं आहे. मात्र पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करण्यासाठी या सुपरहिरोंची मदत घेतलीय. हॅलोविन पार्टीमध्ये (Halloween Party) पोलिसांनी या सुपरहिरोंसारखे कपडे घालून गुन्हेगारांना अटक केलीय.

हेही वाचा :  Coronavirus Updates : अरे बापरे ! चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर

हे ही वाचा : एक सेलिब्रिटी ठरला शेकडोंच्या मृत्यूचं कारण? जाणून घ्या अपघाताची इनसाईड स्टोरी!

स्पायडर-मॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर आणि ब्लॅक विडो या सुपरहिरोंच्या पोशाखात पोलीस अधिकारी पेरूमध्ये (Peru) हॅलोविन पार्टीच्या दिवशी थेट ड्रग तस्करांच्या घरात घुसले. ड्रग्ज विक्रेत्यांना (drug bust) सुरुवातीला ‘अ‍ॅव्हेंजर्स’ (Avengers) पाहून आनंद झाला होता. पण जेव्हा या पोलिसांनी आपलं खरं रुप दाखवलं ते सर्वांचेच धाबे दणाणले. द सनच्या वृत्तानुसार पोलीस अधिकार्‍यांनी बेसिक कोकेनची 3,250 छोटी पॅकेट, कोका पानाचा अर्क तसेच 287 बॅग कोकेन आणि 127 बॅग गांजा असा अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. 

बीबीसीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये  हे अ‍ॅव्हेंजर्स सॅन जुआन डी लुरिगांचो परिसरातील एका घरात घुसताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॅप्टन अमेरिका थॉरच्या हॅमरचा वापर करून दरवाजा उघडताना दिसत आहे. पोलिसांनी अगदी धाडसीपणाने ही कारवाई करत ड्रग्ज विक्रेत्यांना ताब्यात घेत बेड्या ठोकल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. “या इमारतीत एक संपूर्ण कुटुंब ड्रग्जचा व्यवसाय करत होते. हे सर्व ड्रग्ज जवळच्या पार्कमध्ये विकले जाणार होते,” असे कर्नल डेव्हिड विलानुएवा, यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा :  ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे फिरला? धक्कादायक प्रवास मार्ग आला समोर

हे ही वाचा :  मृत्यूच्या तांडवातून स्वत:ला सावरत, जीव वाचलेल्या मराठी मुलीची कहाणी

डेली मेलच्या वृत्तानुसार पेरूमध्ये एक किलो कोकेन पेस्टची किंमत अंदाजे 380 डॉलर आणि एक किलो कोकेन हायड्रोक्लोराईडची किंमत सुमारे 1,000 डॉलर आहे. दरम्यान, ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या पोशाखात पोलिसांना पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. मात्र या कारवाईनंतर पोलिसांचे कौतुक केले जातय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …