… म्हणून सुषमा अंधारेंना भाषण करण्यासाठी बंदी घातली; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

निलेश खरे, झी मिडिया, शिर्डी : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांची . जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये (Muktai Nagar) होणारी सभा अखरे रद्द झाली. या सभेवरुन दिवसभर जळगावात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता (Maharashtra Politics).  सभा रद्द झाली असली तरी सुषमा अंधारे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(NCP leader Eknath Khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत(Latest Political Update). 

सुषमा अंधारे प्रक्षोभक भाषण करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा परंतु कोणत्याही नेत्याला अशा प्रकारे भाषण करायला बंदी घालणे म्हणजे अघोषित आणीबाणी असण्यासारखे असल्याचा हल्लाबोल खडसे यांनी केला. शिंदे फडणवीस सरकार  अंधारे यांना घाबरत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मागे  शेकडो पोलीस तैनात करुन एका ठिकाणी आणून ठेवले. दुसरीकडे अंधारे यांना सभा घ्यायला बंदी घालत बंदीस्त सभागृहात सुद्धा सभा घेण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. अशा बंदिस्त सभागृहात सभा घ्यायला बंदी करता येत नाही.  एखादी संस्था यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. 

हेही वाचा :  NPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा

सुषमा अंधारे यांचा धसका या सरकारने घेतलेला दिसतोय. यामुळेच पोलीस बंदोबस्त वाढवून भाषणाला बंदी करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

वाद आणखी पेटणार 

सुषमा अंधारे यांची जळगावातील सभा रद्द झाली आहे. ज्या हॉटेलमध्ये सुषमा अंधारे थांबल्या होत्या तेथे मोठा पोलिस बंदोबस्त पहायला मिळत आहे. नजरकैदेपेक्षा भयानक स्थिती असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यामुळे हा वाद आणखी पेटणार आहे. 

सुषमा अंधारे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

सुषमा अंधारे आपल्या आक्रमक भाषणातून शिंदे गट तसेच भाजप नेत्यांवर सातत्याने टीकेची झोड उडवत आहेत. वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, सातत्याने त्या सभा घेत आहेत रॅली काढत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …