Sonam Kapoor : ‘हा अनुभव खूप खास…’, अनुष्का शर्माकडून सोनम कपूरला ‘मातृत्वा’च्या शुभेच्छा!

Sonam Kapoor Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने नुकतीच तिच्या ‘मातृत्वा’ची घोषणा केली. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा (Anand Ahuja) यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपण आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. या पोस्टनंतर सोनम कपूर आणि आनंद आहुजावर आनंदाचा वर्षाव होत आहे. आई होणाऱ्या सोनमवर चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने देखील आपल्या मैत्रिणीला अर्थात सोनम कपूरला सोशल मीडियावर पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहे. अनुष्का देखील एका मुलीची आई बनली आहे. अनुष्का आणि विराट यांच्या लेकीचे नाव ‘वामिका’ आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आनंद आणि सोनमचा फोटो शेअर करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने लिहिले, ‘अभिनंदन @sonamkapoor आणि @anandahuja हा अनुभव अतुलनीय आणि खास आहे! तुम्हाला भरपूर प्रेम आणि आनंद मिळो ही शुभेच्छा.’

पाहा पोस्ट :


सोनमने तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सोनमने कॅप्शन लिहिले की, ‘चार हात, जे तुझी जमेल तितकी काळजी घेतील. दोन ह्रदये जी तुझ्या सोबत धडधडतील. एक कुटुंब जे तुला प्रेम आणि पाठींबा देईल. आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत.’

हेही वाचा :  सोनम कपूरनं विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट

पाहा फोटो :

प्रेग्नंसी फोटो व्हायरल!

बेबी बंपसोबत अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पती आनंदसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये सोनमने काळ्या रंगाचा आऊटफिट घातला असून, बेबी बंपवर तिचा हात ठेवला आहे. याआधीही सोनम प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा असल्याचे म्हटले होते.

सोनम तिच्या वैवाहिक जीवनातही खूप आनंदी आहे. अभिनेत्री अनेकदा पती आनंद आहुजासोबत तिचे फोटो शेअर करत असते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनम कपूरने ‘सांवरिया’ या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. लग्नानंतर अभिनेत्रीने मनोरंजनविश्वापासून अंतर राखले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …