Tag Archives: मनोरंजन

सेटवरची पहिली भेट ते लग्न, अजय देवगण-काजोलची फिल्मी लव्हस्टोरी माहितीये?

Ajay Devgn Birthday Special : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. काजोल तिच्या बबली स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते, तर अजय देवगणचे शांत वागणे चाहत्यांना खूप प्रभावित करते. अजय देवगण आणि काजोल एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत, यात काही शंका नाही. पण, दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत. दोघांना एकत्र पाहून चाहतेही …

Read More »

‘राधेश्याम’पासून ‘दसवीं’ पर्यंत ‘हे’ सिनेमे आणि वेब सीरिज एप्रिलमध्ये ओटीटीवर होणार प्रदर्शित

Upcoming Web Series and Films : एप्रिलमध्ये ‘केजीएफ 2’, ‘हीरोपंती2’, ‘रनवे 34’ आणि ‘जर्सी’ सारखे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. तसेच या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.  कौन प्रवीण तांबे कौन प्रवीण तांबे? हा सिनेमा 1 एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमात मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य …

Read More »

पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाह किती गल्ला जमवला?

RRR Box Office Collection : तेलुगू सिनेमाचे दोन दिग्गज कलाकार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरसह (Jr. NTR) अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा चौकडीच्या ‘RRR’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या सहा दिवसांत सुमारे 448 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या कमाईने विशेषत: तेलुगू राज्य आणि यूएसएमध्ये अनेक …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चं तिकीट दाखवल्यावर सूट देण्याऱ्या दूध विक्रेत्याला धमक्या

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून दुधावर सवलत देणाऱ्या अनिल शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत. अनिल शर्मा यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाची तिकिटे दाखवल्यास दुधावर 10 रुपयांची सूट दिली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना या संदर्भात धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी शर्मा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल …

Read More »

Ranbir Alia Wedding : रणबीर कपूरनंतर आलिया भट्टनेही लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा! म्हणाली ‘हे

Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कधी लग्न करणार, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते दोघांचे लग्न पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळेच बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अलीकडेच रणबीर कपूरने त्याच्या …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ वादानंतर जॉन अब्राहमचं कपिल शर्मा शोवर मोठं वक्तव्य, म्हणाला ‘इथे आलो म्हणजे.

John Abraham : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या ‘अटॅक’ (Attack) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) प्रमोशनसाठी पोहोचला होता, मात्र आता त्याने कपिलच्या शोबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या खूप चर्चा आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक स्टार जॉन अब्राहम सध्या त्याच्या नवीन चित्रपट ‘अटॅक’मुळे चर्चेत आहे. …

Read More »

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर

Anupam Kher : काश्मिरी पंडितांचे निर्गमन आणि हत्यांवरील, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या प्रसिद्ध चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) म्हणतात की, ज्यांना वाटते की, या चित्रपटात अपूर्ण सत्य दाखवण्यात आले आहे, ते स्वत:चे सत्य मांडू शकतात. अशा लोकांनी स्वत:चा चित्रपट बनवून लोकांना सत्य काय ते दाखवावे. त्यांनी चित्रपटाची निंदा करणाऱ्यांना …

Read More »

TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर ‘या’ पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई

TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर पाच बॉलिवूड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. यात ‘आरआरआर’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ’83’ सिनेमाचा समावेश आहे.  आरआरआर (RRR) : एसएस. राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा …

Read More »

‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!

RRR Box Office Collection : ‘आरआरआर’च्या (RRR) हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने सोमवारी 17 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची एकूण कमाई 4 दिवसांत 92 कोटींवर गेली आहे. याचाच अर्थ हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. याची शुक्रवारच्या ‘आरआरआर’च्या कलेक्शनशी तुलना केली, तर कमाईत 10-15 टक्क्यांची किंचित घट दिसून …

Read More »

बालकलाकार म्हणून पदार्पण, ‘शोले’ चित्रपटातील ‘सुरमा भोपाली’ने मिळवून दिली ओळख!

Happy Birthday Jagdeep : चाळीस-पन्नासच्या दशकात अभिनयाच्या वेडाने झपाटलेले अनेक कलाकार स्वप्ननगरी मुंबईत दाखल झाले. मात्र याच काळात अपघाताने, ओघाओघानेच या चंदेरी दुनियेत प्रवेश केलेल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेते जगदीप (Jagdeep). आपल्या विनोदी अभिनय शैलीने त्यांनी सगळ्यांना हसवलेच, पण त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या. 29 मार्च 1939 रोजी मध्यप्रदेशातील दतियामध्ये जगदीप यांचा …

Read More »

रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ‘RRR’चा दबदबा, चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!

RRR Box Office Collection : एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) ‘RRR’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 223 कोटींची कमाई केली होती. चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशातही कमाईच्या बाबतीत पुढे आहे. हिंदी व्हर्जनच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, …

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘द कश्मीर फाइल्स’ची जादू कायम, तिसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) स्टारर ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. चित्रपट रिलीज होऊन 17 दिवस उलटलेट, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटामुळे लोक थिएटर्सकडे वळत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवत चित्रपटाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनने 250 कोटींचा टप्पा ओलांडला …

Read More »

Suhana Khan : शाहरुखचा ‘पठाण’ लूक पाहून लेक सुहानाही स्तब्ध! फोटो रीपोस्ट करत म्हणाली…

Suhana Khan : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याची मस्क्युलर बॉडी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नुकताच त्याने त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या किलर लूक दाखवताना दिसला आहे. शाहरुखचा हा लूक पाहून त्याची लेक सुहाना खानही (Suhana Khan) थक्क …

Read More »

रणबीर कपूर नव्हे विराट कोहलीला ‘ब्रह्मास्त्र’मध्ये घ्यायचं होतं!

Brahmastra : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022ची सुरुवात शनिवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने झाली. या खास प्रसंगी ‘ब्रह्मास्त्र’ची टीमही मैदानावर उपस्थित होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी आयपीएल 2022 लाँचचा आनंद लुटला. यावेळी अयान मुखर्जीला, तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात कोणत्या क्रिकेटरला …

Read More »

‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक, म्हणाला ‘शाहरुख अगर थोडा रुक भी गया…’

Pathaan : बॉलिवूडचा किंग खानच्या ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला होता. मात्र, त्यात फक्त अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) दिसले होते. त्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लूक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. पण, त्यांना बॅकग्राउंडमध्ये फक्त त्याचा आवाज ऐकू आला. आता शाहरुखनेच …

Read More »

विवाहित असतानाही अमृता सिंहच्या प्रेमात पडलेला सनी देओल, ‘या’ अभिनेत्रींशीही जोडले नाव!

Sunny Deol : बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलने (Sunny Deol) 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पहिल्या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमृता सिंह मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात एकत्र काम करत असताना, सनी देओल आणि अमृता एकमेकांना पसंत करू लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप गाजल्या होत्या. अगदी …

Read More »

अरबोंची संपत्ती, एअर लाईन्सचा मालक अभिनेता रामचरण! जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी…

Ram Charan Birthday : ‘मगधीरा’, ‘येवडू’, ‘रंगस्थलम’, ‘आरआरआर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला दाक्षिणात्य अभिनेता रामचरण (Ram Charan) आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहेत. रामचरण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी याचा मुलगा आहे. राम चरण याचा जन्म 27 मार्च 1985 रोजी चेन्नई येथे झाला. ‘चिरुथा’ या चित्रपटातून त्यानी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. रामचरण याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी 2007मध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाला …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘बच्चन पांडे’, नवीन वर्षात ‘या’ सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!

Bollywood Movies : नवीन वर्षात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक सिनेमांचा सहभाग आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.  बधाई दो : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा ‘बधाई दो’ हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ …

Read More »

अभिनेता जिवंत असतानाही सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #RipJosephVijay! जाणून घ्या नेमकं काय झालं…

Joseph Vijay : प्रसिद्ध साऊथ स्टार जोसेफ विजय चंद्रशेखर (Joseph Vijay) याला चाहते ‘थालापती विजय’ (Thalapathy Vijay) म्हणून ओळखतात. थालापती विजयने दक्षिण चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. लवकरच या अभिनेत्याचा ‘बीस्ट’ (Beast) हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. पण, अचानक त्याच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि युझर्स एकामागून एक ट्विट करत आहेत. अभिनेता जिवंत असूनही ट्विटरवर …

Read More »

Madhuri Dixit : गगनचुंबी इमारतीतील आलिशान महाल! माधुरी दीक्षितच्या नव्या घराची ‘व्हर्च्युअल टूर

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि तिचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी नुकतेच मुंबईत भाड्याने घर घेतले आहे. त्यांचे हे अपार्टमेंट वरळी, मुंबई येथे आहे. मुंबईत घरे जितकी मोठी आहेत, तितकीच त्यांची किंमतही गगनाला भिडलेली आहे. माधुरी दीक्षितच्या घराचे भाडेही लाखांत आहे. रिपोर्ट्सनुसार, माधुरीने हे घर 12.5 लाख रुपये प्रती महिने इतक्या रकमेत भाड्यावर घेतले …

Read More »