देशातील आयआयटी, आयआयएममध्ये ११ हजार पदे रिक्त

Professor Recruitment: देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या १८,९५६ मंजूर पदांपैकी एकूण ६,१८० पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आयआयटीमध्ये ११,१७० मंजूर पदांपैकी एकूण ४,५०२ पदे रिक्त आहेत, तर आयआयएममध्ये एकूण १,५६६ प्राध्यापकांपैकी ४९३ पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी उत्तरात म्हटले आहे.

 

IIT Recruitment
देशातील आयआयटी, आयआयएममध्ये ११ हजार पदे रिक्त
वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये (आयआयएम) प्राध्यापकांच्या ११ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीत समोर आली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या १८,९५६ मंजूर पदांपैकी एकूण ६,१८० पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आयआयटीमध्ये ११,१७० मंजूर पदांपैकी एकूण ४,५०२ पदे रिक्त आहेत, तर आयआयएममध्ये एकूण १,५६६ प्राध्यापकांपैकी ४९३ पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी उत्तरात म्हटले आहे.

हेही वाचा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आठ निकाल अद्यापही रखडले

रिक्त पदे निर्माण होणे व त्यांची भरती करणे ही एक निरंतर व सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. केंद्रीय विद्यापीठे या स्वायत्त संस्था असून केंद्रीय कायद्यांच्या अंतर्गत त्यांची स्थापना झाली आहे. या कायद्यांच्या आधारेच त्यांच्या भरती प्रक्रियेचे स्वरूप आखण्यात आले आहे. यासाठी अन्य नियम व विद्यापीठ अनुदान आयोगाचेही काही नियम आहेत. या सर्व गोष्टींच्या आधारे ही भरती केली जाते, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
MPSC Recruitment: साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त
सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना ‘मिशन मोड’मध्ये रिक्त पदे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या भरतीसाठी मंत्रालयाने मासिक देखरेख यंत्रणा स्थापन केली आहे, असेही ते म्हणाले. द सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स (रिझर्व्हेशन इन टीचर्स केडर) अॅक्ट, २०१९ हा कायदा ९ जुलै २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला. या कायद्यानुसार सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना आरक्षण लागू आहे. परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेल्या संस्थांचा यास अपवाद आहे, असेही प्रधान म्हणाले. शिक्षकांच्या श्रेणीतील सर्व पदांच्या थेट भरतीमध्ये या कायद्यानुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे आणि एकदा आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर या कायद्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :  महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

९६१ पदे एससी प्रवर्गासाठी

केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयएममधील रिक्त पदांपैकी ९६१ पदे एससी प्रवर्गासाठी, ५७८ एसटी प्रवर्गासाठी, १,६५७ ओबीसी पदे राखीव आहेत. आर्थिक मागास वर्गासाठी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीसाठी राखीव रिक्त पदे अनुक्रमे ६४३ आणि ३०१ पदे राखीव आहेत. देशात २३ आयआयटी आहेत तर ‘आयआयएम’ची संख्या २० आहे.
Postman Recruitment: टपाल विभागात पोस्टमनची पदे रिक्त

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …