सलमान खानसोबत काम नको रे बाबा! या अभिनेत्रींनी ‘भाईजान’बरोबर काम करायला दिला स्पष्ट नकार

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सलमान खान चं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्याच्याबरोबर काम करण्याचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबरच नवोदित अभिनेत्रींचंही स्वप्न असतं. सलमाननंदेखील अनेक अभिनेत्रींना हिंदी सिनेसृष्टीत त्याच्या सिनेमांतून लाँच केलं. त्यामुळे त्याच्याबरोबर सिनेमात काम करायला मिळणं म्हणजे यशाचा हमाखास मार्ग आहे असं म्हटलं जातं. मात्र, बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी सलमानसोबत काम करायला नकार दिला.

अर्जुनबद्दल भलतंच बोलून गेला वरुण, अनिल म्हणाले, ‘त्याचं ब्रेकअप होईल’

ज्या अभिनेत्रींनी सलमानसोबत सिनेमात काम करायला नकार दिला त्यामध्ये ९० च्या दशकातील अभिनेत्रींचा समावेश तर आहेच शिवाय आजच्या काळातील काही प्रसिद्ध अभिनेत्रींचाही समावेश आहे. या अभिनेत्रींनी सलमानबरोबर काम करायला विविध कारणांमुळे नकार दिला आहे. जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल आणि त्यांनी सलमानला नकार का दिला याच्या कारणांबद्दल…


दीपिका पादुकोण (Deepika Padukone)

दीपिका पादुकोण आणि सलमान खान या दोघांमध्ये छान बाँडिंग आहे. दोघंजण एकमेकांचं कौतुक करतात. परंतु जेव्हा दीपिकाला बजरंगी भाईजान, सुलतान, किक सारख्या सिनेमांत काम करण्यासाठी विचारणा झाली तेव्हा मात्र तिनं नकार दिला. अनेकदा त्यावरून सलमानही तिला टोमणे मारतो.


कंगना रणौत (Kangana Ranaut)

कंगना रणौत हिला सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या सुलतान सिनेमासाठी विचारणा झाली होती. परंतु कंगनानं या सिनेमात काम करायला नकार दिला. त्यानंतर कंगनानं सांगितलं की, या सिनेमात काम करायला नकार दिला. त्यानंतर आदित्य चोप्रा यानं सांगितलं की, आता त्यालाही तिच्याबरोबर कधीच काम करायचं नाही.

पंकज यांनी सिद्धार्थबाबत केला खुलासा, शहनाजला म्हणाले ‘थँक्यू!’


ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी हम दिल दे चुके सनम सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांच्यात काही तरी बिनसलं आणि तो वेगळे झाले. या सिनेमानंतर दोघं कोणत्याही सिनेमात एकत्र दिसले नाही. इतकंच नाही तर सिनेविश्वाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात ते सहभागी झाले तरी एकमेकांकडे दुर्लक्ष करतात.


सोनाली बेंद्रे (Sonali Bendre)

सोनाली बेंद्रे आणि सलमान खान यांनी हम साथ साथ है सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळीच काळविटाच्या शिकारीचं प्रकरण घडलं आणि ते खूपच चर्चेत आलं. याप्रकरणी सलमानसह सोनाली, सैफ अली खान यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं होतं. या सिनेमानंतर सोनालीनं कधीही सलमानबरोबर काम केलं नाही. अनेक निर्मात्यांनी त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न केले परंतु ते सगळे अयशस्वी ठरले.

चित्रपटगृहात १६ सप्टेंबरला अनलिमिटेड कल्ला करायला येतोय ‘भाऊबळी’ चित्रपट



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …