Roti For Weight Loss : पोट व कंबरेवरची चरबी कमी करते ‘या’ पिठापासून बनलेली चपाती, 1 आठवड्यातच दिसू लागेल कमालीचा फरक!

चपाती हा आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. डाळीपासून भाजीपर्यंत आणि करीपासून नॉनव्हेजपर्यंत कोणत्याही डिशबरोबर चपाती खाता येते. हे सर्व पदार्थांसोबत एक परिपूर्ण कॉम्बिनेशन करते. चपाती आपल्या आहारातील मुख्य अन्नपदार्थास अधिक पौष्टिक बनवते. कोणतेही जेवण त्याशिवाय अपूर्णच असते. आपण दररोज खातो ती संपूर्ण गव्हाची चपाती ही केवळ कार्बोहायड्रेट्सनीच समृद्ध नसते तर त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप चांगले असते. पण जर तुम्हाला गव्हाची चपाती खाऊन कंटाळा आला असेल आणि त्याऐवजी आरोग्यदायी काहीतरी पर्याय निवडायचा असेल, तर अजून एक प्रकारची चपाती आहे, ज्याचा आहारात सहज समावेश करता येऊ शकतो. ती म्हणजे लो कॅलरी ओट्स चपाती. होय, ही चपाती खायलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया ओट्स चपातीबद्दल. पण त्याआधी आपण गव्हाच्या चपातीचेही फायदे जाणून घेणार आहोत.

गव्हाच्या चपातीत किती कॅलरीज असतात

गव्हाच्या चपातीमध्ये सुमारे 100 कॅलरीज असतात. गव्हाच्या लहान आकाराच्या चपातीमध्ये जवळजवळ 90 कॅलरीज आणि मठ्या आकाराच्या चपातीमध्ये 110 कॅलरीज असू शकतात. याचा अर्थ जर आपण 2 ते 3 चपात्या खात असू तर 200 ते 300 कॅलरीज सहज आपल्या पोटात जातात.

हेही वाचा :  Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?

(वाचा :- World TB Day 2022 :- ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना एका क्षणात विळख्यात घेतो टीबी, दुर्लक्ष करू नका अन्यथा बेतेल जीवावर..!)

कशापासून बनते लो कॅलरी चपाती

लो कॅलरी चपातीसाठी रोल्ड ओट्स वापरले जातात. या ओट्स चपातीमध्ये सरासरी 70 कॅलरीज असतात. लहान आकाराची ओट्स चपाती खाल्ल्यास सुमारे 60 कॅलरीज शरीराला मिळतात तर मोठी ओट्स चपाती खाल्ल्यास 80 कॅलरीज शरीरात जातात. जरी आपण दोन ओट्स चपात्या खाल्ल्या तरी आपण फक्त 120 ते 140 कॅलरीजचेच सेवन करतो. जे लोक डायटिंग करत आहेत किंवा कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याचा विचार करत आहेत, ते गव्हाच्या चपातीऐवजी ओट्सची चपाती सहज खाऊ शकतात. या ओट्स चपातीमध्ये कॅलरीज तर कमी असतातच पण नेहमीच्या गव्हाच्या चपातीपेक्षा ती जास्त कापसासारखी नरम आणि स्वादिष्ट असते.

(वाचा :- Covid19 4th wave : बापरे सावधान.. लवकरच येणार चौथी लाट? चीनमध्ये Omicron BA.2 मुळे पुन्हा लागला लॉकडाउन, ‘ही’ आहेत 10 नवी लक्षणे..!)

कशी बनवावी ओट्सची चपाती?

साहित्य-

  • 1 कप – ओट्स
  • १ कप – पाणी
  • 2 चिमूटभर – मीठ
  • अर्धा लहान चमचा – तूप

(वाचा :- Cancer causing foods : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत ‘हे’ 5 पदार्थ, माहित असूनही लोक रोज न चुकता खातातच..!)

हेही वाचा :  महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!

ओट्सची चपाती बनवण्याची रेसिपी

  1. ओट्स मिक्सरच्या भांड्यात घ्या.
  2. जाडसर ओट्स पावडर तयार करण्यासाठी ओट्स ब्लेंड करा.
  3. आता ओट्सचे पीठ चाळणीतून चाळून त्याची बारीक पावडर घ्या.
  4. एका कढईत एक कप पाणी घालून उकळी येऊ द्या.
  5. आता त्यात दोन चिमूटभर मीठ आणि तूप मिसळा.
  6. आता या पाण्यात ओट्सचे पीठ घाला आणि मिक्स करण्यासाठी चमच्याचा वापर करा.
  7. जर तुम्हाला वाटत असेल की ओट्सचे पीठ खूप चिकट आहे तर घाबरू नका. सतत ढवळत राहा आणि 2 मिनिटे चांगले शिजवा.
  8. तुम्हाला एक चिकट आणि मऊशार पीठ मिळेल.
  9. एका भांड्यात ते पीठ घ्या आणि थोडे थंड झाल्यावर हाताने चांगले मळून घ्या.
  10. आता हे पीठ रोज ओट्सची चपाती बनवण्यासाठी वापरा आणि ही ओट्सची चपाती तुमच्या आवडत्या डिशसोबत सर्व्ह करा.
  11. आम्‍ही तुम्‍हाला सांगू की बीटा ग्लुकन हे ओट्समध्‍ये विपुल प्रमाणात आढळणारे विरघळणारे फायबर (soluble fiber) आहे. हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. ओट्सची चपाती खाल्ल्याने शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल तयार होते आणि एकूण कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत होते.

(वाचा :- Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!)

ओट्सची चपाती खाण्याचे फायदे

  1. ओट्सच्या चपातीमध्ये फार कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे वेटलॉससाठी ही फायदेशीर असते.
  2. मधुमेह असलेल्यांसाठी ओट्सची चपाती चांगली असते ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही
  3. ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबर असते जे हृदयरोग असणाऱ्यांसाठी चांगले आहे.
  4. यामुळे पोट लगेच भरते व दीर्घकाळ भरलेले राहते
  5. पचनक्रिया सुधारते
  6. गुड कोलेस्ट्रॉल वाढते
  7. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो
  8. दरम्यान, केवळ चांगले डाएट घेऊन वजन कमी होणार नाही तर डाएटसोबत नियमित एक्सरसाईजही वजन घटवण्यासाठी तितकीच गरजेची आहे. त्यामुळे ओट्स चपाती खाण्यासोबत दररोज ३० मिनिटे व्यायाम जरूर करा.
हेही वाचा :  Google Search चे एक्सपर्ट व्हाल, फक्त या ५ सोप्या ट्रिक्स करा फॉलो

(वाचा :- Vaccination for kids : गुड न्यूज, मुलांचे करोना वॅक्सिनेशन झाले सुरू, वॅक्सिन देण्याआधी आणि दिल्यानंतर करा ‘ही’ 5 कामे, साइड इफेक्ट्सपासून होईल बचाव)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …