तुमच्या शहरात Petrol-Diesel स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price on 26 April 2023 : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) दर जाहीर केले असून आजही तेलाचा किंमती जैसे थे आहेत. गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलवर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज वाहन इंधनचे सुधारित दर जाहीर करतात.  26 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या दरांनुसार आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे तब्बल वर्षभरापासून वाहन इंधनाचे दर जैसे थे आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल गेल्या वर्षी 22 मे रोजी करण्यात आला होता. 

दररोज सकाळी 6 वाजता देशातील तेल विपणन कंपन्या वाहन इंधनाचे नवीन दर अपडेट करतात. किंमतींमध्ये काही बदल असल्यास ते अपडेट केला जातो. येथे तुम्हाला मुंबई, दिल्ली, कोलकात, चेन्नईसह विविध शहरांच्या किमती कळू शकतात. आज जाहिर झालेल्या दरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर दिल्लीत आजही एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. 

हेही वाचा :  कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

वाचा : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात. 

तर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर आहे. तर गाझियाबादमध्ये पेट्रोलचा दर 96.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर आहे.  

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

हेही वाचा :  Cidco Lottery 2023 : सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी आता घरे

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर SMS पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …