Petrol Diesel Price: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price on 29 March 2023 : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या (Maharashtra Petrol Rate) किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारिच आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जारी केले जातात. त्यानुसार आज कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली. ब्रेंट क्रूड आता 80 डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती वाढल्या आहेत.

या शहारांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून, गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 25 पैशांनी महागले असून ते 96.92 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल 24 पैशांनी महागले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग झाले असून ते 96.43 रुपये प्रति लिटरवर गेले आहे. तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 50 पैशांनी महाग होऊन 108.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 47 पैशांनी वाढून 94.86 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

हेही वाचा :  Petrol Rate Today : महिन्याच्या शेवटी खिशाला झळ की दिलासा? पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय?

वाचा: पावसाच्या सरी Weekend गाजवणार, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, देशात कसं असेल हवामान?

तर गेल्या 24 तासात त्याच्या किमतीत मोठी उसळी आली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत $1 ने वाढून प्रति बॅरल $79.07 वर पोहोचली आहे. जागतिक बाजारात WTI चा दर देखील $1 ने वाढून प्रति बॅरल $73.79 वर पोहोचला आहे.

चार महानगरमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिट
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये दर बदलले

  • गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.26 रुपये आणि डिझेल 89.45 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  • गुरुग्राममध्ये पेट्रोल 96.97 रुपये आणि डिझेल 89.84 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  • जयपूरमध्ये पेट्रोल 109.46 रुपये आणि डिझेल 94.61 रुपये प्रति लिटर झाले आहे.
हेही वाचा :  7 मुलांची आई 3 मुलांच्या बापाबरोबर पळून गेली, प्रेमप्रकरणचा धक्कादायक शेवट

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …