Today Petrol-Diesel Rate : महागड्या पेट्रोल-डिझेलचा झटका सर्वसामान्यांना बसणार का? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price on 05 January 2023: सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसावे लागत आहे. आता नवीन वर्ष सुरू झाले असताना आता तरी जनतेची महागाईतून सुटका होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आज, 5 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा फटक पेट्रोल- डिझेलच्या (petrol diesel rate) किमतींना बसतो. परिणामी महागड्या पेट्रोल आणि डिझेलचा झटका जनतेला बसणार का? मात्र आज महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासा देणार बातमी आहे, ती म्हणजे देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किमती 0.80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर प्रति बॅरल $ 73.42 वर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.68 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून ती 78.37 टक्क्यांवर पोहोचली आहे.

हेही वाचा :  जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे कमवले? हे महाराष्ट्रातील बेरोजगारांना सांगा; अजय देवगणला पत्र

चार महानगरांमध्ये 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत

दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

वाचा : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पाहा फ्रीमध्ये, सामना कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या 

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

गुरुग्राम – पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
पाटणा – पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
जयपूर – पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
नोएडा – पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
लखनौ- पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
बंगळुरू – पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
हैदराबाद – पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर ‘असे’ तपासा 

भारतातील सरकारी तेल कंपन्या देशातील विविध राज्ये आणि शहरांनुसार दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. यासाठी तुम्हाला कंपन्यांना एसएमएस पाठवावा लागेल. HPCL ग्राहकांची नवीन किंमत तपासण्यासाठी, HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना RSP<डीलर कोड> 9224992249  वर पाठवणे आवश्यक आहे. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवतात. यानंतर तेल कंपनी ग्राहकांना मेसेज करून पेट्रोल-डिझेलची किंमत सांगेल. अशा प्रकारे तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर कळू शकतात. 

हेही वाचा :  Viral Video: चारही बाजूने पाण्याचा रौद्र प्रवाह आणि मधोमध गाडीसह अडकलेली महिला; पुढे काय झालं ते पाहा?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या ‘या’ मार्गांसाठी ‘समर स्पेशल’ ट्रेनची सोय

Indian Railway : एकिकडे कोकण रेल्वेनं (Konkan Railway) पावसाळी वेळापत्रक जारी केलं नसल्यामुळं मध्य रेल्वेच्या …

‘माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता…’ पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील …