आई कुठे काय करते : प्रेमाचं राहू दे बाजूला, आशुतोषच्या बेतलं जीवावर!

मुंबई :आई कुठे काय करते मालिकेत अपेक्षित वळण तर आलं. म्हणजे आशुतोषनं अरुंधतीला थेट लग्नाबद्दलच विचारलं. ती आधी भांबावली. नातं बदललं की माणूस बदलेल का, हा विचार तिच्या मनात येत आहे. आशुतोष तिला तिचा वेळ देतोय. तिनंही स्पष्ट नाही सांगितलं नाही. मी विचार करून सांगते म्हणाली. नाही म्हणायला मुलांचं दडपण तिच्यावर आहेच.

आता पुढच्या भागाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात महिला आश्रमात एक स्त्री घाबरून आश्रयाला आलीय. तिला तिच्या नवऱ्यापासून संरक्षण हवंय. तिथे अरुंधती आणि आशुतोष पोहोचलेत. अरुंधती तिला धीर देतेय. तेवढ्यात तिचा नवरा तिथे उपस्थित होतो आणि जबरदस्तीनं बायकोला घेऊन जायला लागतो.

अर्जुनबद्दल भलतंच बोलून गेला वरुण, अनिल म्हणाले, ‘त्याचं ब्रेकअप होईल’

आशुतोष आणि अरुंधती मध्ये पडतात. तो अरुंधतीला ढकलतो आणि आशुतोषच्या मानेवर सुरा ठेवतो. आशुतोषनं पोलिसांना बोलावलं असतंच. आता पुढे काय होणार, याची उत्सुकता आहेच. देशमुखांच्या घरीही अभिषेक आणि अनघा यांचं बिनसलं आहेच. सगळे अनघाच्या बाजूनं उभे राहिलेत. अनिरुद्ध सोडला तर कोणीच अभिच्या बाजूनं नाही.


याआधी घरी अभी कामावरून आलाय. आल्या आल्या तो अनघाला हाक मारतो. तेव्हा कांचन म्हणते अनघा घरी नाहीय. ती अरुंधतीकडे गेली आहे. त्यासरशी त्याचा पारा चढतो. तो अनघाला फोन लावतो. अभी घरी आला आहे म्हटल्यावर अनघा लगेच घरी येते म्हणते. तेव्हा चिडून अभी तिला म्हणतो, तू घरी येऊच नको. त्यावर अनिरुद्ध आपल्या मुलाची आवाज चढवल्याबद्दल पाठ थोपटतो.

Video : आनंदाच्या पालखीचा मी भोई, भाऊजींनी साजरी केली ‘होम मिनिस्टर’ची १८

कांचन अनिरुद्धला विचारते, तू इतका कडवट का वागतोस? त्यावर तो म्हणतो, आमचा घटस्फोट झाल्यानंतर अरुंधती खूप पुढे निघून गेली. पण मी आहे तिथेच आहे. याचं दु:ख वाटतं.

चित्रपटगृहात १६ सप्टेंबरला अनलिमिटेड कल्ला करायला येतोय ‘भाऊबळी’ चित्रपट



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …