हे वाचा-BMM4: गरबा झाला, पैशांचा पाऊसही पडला… कोण ठरलं पहिला कॅप्टन?
एक टेक्स्ट फोटो शेअर करत प्रवीण यांनी चाहत्यांना आवाहन केले आहे की, ‘नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे. माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. तिथून अनेक जणांना खोट्या लिंक्स, फोन नंबरची मागणी इ. मेसेज केले जात आहेत. कुणीही रिप्लाय देऊ नये.’ ही पोस्ट शेअर करताना तरडे यांनी इन्स्टाग्रामविषयीही माहिती दिली आहे. त्यांनी असे कॅप्शन दिले आहे की, ‘इन्स्टाग्राम चालू आहे फेसबुक हॅक झालंय. कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. माझं इन्स्टाग्राम फेसबुक लिंक असल्यामुळे हा मेसेज सुध्दा फेसबुकला दिसू शकतो. तसदीबद्दल क्षमस्व.’
दरम्यान प्रवीण यांनी मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्यानंतर त्यावर अनेक चाहत्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. अनेकांनी कमेंट करत आता प्रवीण यांना काय करावे लागेल याचा सल्लाही दिली आहे.
हे वाचा-आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; फोटो होतायंत व्हायरल
दरम्यान प्रवीण यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच फेसबुक अकाउंट हॅक झाल्याविषयी माहिती दिली होती. ०३ ऑक्टोबर रोजी केलेल्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये प्रवीण म्हणाले होते की, ‘माझं फेसबुक हॅक झालंय पण इन्स्टाग्राम चालू आहे. आता फेसबुक पुन्हा सुरू होईपर्यंत इकडेच भेटू.’ त्यानंतर आता त्यांनी संबंधित फेसबुक अकाउंटवरुन विविध मेसेज जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
याआधीही अनेकदा विविध सेलिब्रिटींनी फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केली होती. सोशल मीडियावर अनेकदा अशाप्रकारे प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य केले जाते. त्यामुळे सामान्यांप्रमाणेच या सेलेब्सनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या