अभिनेता प्रवीण तरडे सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. लागोपाठ आलेल्या सिनेमांमुळे प्रवीणचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड वाढला आहे. सतत लेटेस्ट अपडेट प्रवीण फेसबुकच्या माध्यमातून देत असतो. अशातच फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानं प्रवीणला मोठा झटका बसला आहे. प्रवीणच्या या अकाउंटवरून अनेक खोट्या लिंक्स तसेच फोन नंबरची मागणी केली होत आहे. प्रविणला ही बाब कळताच त्यानं ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
हेही वाचा – तुमचं Facebook Account हॅक झाल्यास काय कराल? कसं कराल रिकव्हर, वाचा सोपी प्रोसेस
प्रविणनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं म्हटलं आहे की, ‘नमस्कार, मी प्रविण विठ्ठल तरडे. माझे फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. तिथून अनेक जणांना खोट्य लिंक्स, फोन नंबरची मागणी इ. मेसेज जात आहेत. कोणीही रिप्लाय देऊ नये. धन्यवाद’.
त्याचप्रमाणे प्रविणनं पोस्टच्या कॅप्शनमध्येही स्पष्टीकरण देत माफी माहितली आहे. त्यानं म्हटलंय, ‘इन्स्टाग्राम चालू आहे फेसबुक हॅक झालंय. कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. माझं इन्स्टाग्राम फेसबुक लिंक असल्यामुळे हा मेसेज सुध्दा फेसबुकला दिसू शकतो. तसदी बद्दल क्षमस्व’.
केवळ प्रविणचं नाही तर याआधीही अनेक मराठी कलाकारांचं फेसमबुक अकाउंट अशाप्रकारे हॅक झालं आहे. काही दिवसांआधी ‘झिम्मा’चा दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमेचं अकाउंट हॅक झालं होत. तर त्याआधी अभिनेता संतोष जुवेकरनंही फेसबुक अकाउंटवरून अश्लिल फोटो व्हिडीओ शेअर करत असल्याचं सांगितलं होतं. संतोष याची रितसर तक्रार सायबर पोलिसांकडे केली होती. तसंच अभिनेत्री शुभांगी गोखले यांचही फेसबुक हॅक झालं होतं. त्यांनीही सायबर पोलिसात याची तक्रार नोंदवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या