‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वकानीने मालिका सोडून जवळजवळ तीन वर्षे उलटली आहेत.परंतु आजही प्रेक्षक आतुरतेने तिची वाट पाहात आहेत. मालिकेमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या जे पाहून प्रेक्षकांना वाटलं की आता दया परत येईल. परंतु असं काहीच घडलं नाही. तरीसुद्धा मालिकेत दयाबेन परतणार अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. दरम्यान सोशल मीडियावर सतत दयाबेनच्या भूमिकेसाठी निवड झाल्याचं सांगत अनेक अभिनेत्रींच्या नावाची चर्चा होत असते. परंतु दोन्हीपैकी अजून काहीच घडलेलं नाहीय.
(हे वाचा: Bigg Boss 16 च्या घरात रश्मिका मंदानाची एन्ट्री; अब्दू रोजिकच्या प्रेमात पडली नॅशनल क्रश)
यंदाच्या दिवाळीला दिशा वकानी मालिकेत परतणार असल्याची चर्चा सुरु होती. या दिवाळीपासून दिशा पुन्हा एकदा दयाबेनच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकही प्रचंड उत्सुक होते. परंतु नुकतंच मालिका सोडलेल्या तारक मेहता अर्थातच शैलेश लोढा यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे प्रेक्षकांना गोंधळात टाकलं आहे. त्यांची ही क्रिप्टीक पोस्ट पाहून दयाबेन परतणार की नाही? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
शैलेश लोढा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत काही ना काही पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतात. अलीकडे त्यांच्या प्रत्येक पोस्टचा थेट संबंध ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांशी जोडला जात आहे. आजही असंच काहीसं झालं आहे. शैलेश लोढा यांनी काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक कविता पोस्ट केली आहे. लोक आता या कवितेचा थेट संबंध ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांच्याशी जोडत आहेत.
शैलेश लोढा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहलंय, “दुसऱ्यांच्या हक्कासोबत नेहमी जोडले गेले. परंतु कोणाच्याही मनाशी त्यांनी कधीच जोडून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ही वस्तुस्थिती त्यांचा स्वभाव दर्शवते, जे लोक त्यांना सोडून गेले त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही’. अशी क्रिप्टीक पोस्ट लिहत त्यांनी सर्वांना गोंधळात टाकलं आहे. या कवितेचा संबंध जोडत त्यांना दयाबेन मालिकेत परतणार नाहीय असा इशारा द्यायचा आहे कि काय असा अंदाज लावला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या