‘उडारियां’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेत अंकित आणि प्रियांका मुख्य भूमिकेत झळकले होते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. हे दोघेही फारच छान मित्र बनले आहेत. परंतु त्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्यामध्ये मैत्रीपेक्षाही पुढचं नातं असल्याचा अंदाज आहे. या दोन्ही कलाकारांना खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान आता अंकित आणि प्रियांका बिग बॉसच्या घरात एकत्र सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या दोघांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
(हे वाचा:Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात दिसणार ‘उडारियां’ फेम अंकित-प्रियांकाचा रोमान्स; समोर आल्या डिटेल्स )
दरम्यान या शोमधील आणखी एक स्पर्धक आणि ‘छोटी सरदारनी’ फेम अभिनेत्री निमरीत कौर अहलुवालियाने अंकित आणि प्रियांकाच्या नात्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून प्रियांका चहर आणि निमरीत कौर यांच्यामध्ये चांगली मैत्री झालेली पाहायला मिळाली होती. परंतु ज्यावेळी कॅप्टन बनण्याचा प्रक्रियेत निमरीतला प्रियांकामुळे अडचण निर्माण झाली होती. तेव्हापासून निमरीतने अंकिताला टार्गेट करायला सुरुवात केली आहे.
नुकतंच सलमान खानने घरामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान सलमान खानशी संवाद साधताना निमरीतने सांगितलं की, ‘मला या घरात फक्त दोन लोकांपासून अडचण आहे. ते म्हणजे प्रियांका आणि अंकित. मला माहिती नाही त्यांना माझा काय प्रॉब्लेम आहे. कधीही माझयाकडून हे सुरु नाही होत, जेव्हा ते एखाद्या गोष्टीत ऍक्शन घेतात तेव्हा ते माझं रिऍक्शन असतं. निमरीत पुढे म्हणाली, माझं जितकं बोलणं झालं मला असं वाटतं की, अंकित एक चांगला व्यक्ती आहे. परंतु त्याचा प्रामाणिकपणा अंकितासाठी जास्त आहे. त्यामुळे तो आमच्यासोबत हवा तितका संवाद साधत नाही’.
सलमान खान घरातून बाहेर गेल्यानंतर साजिद खान निमरीतला अंकित आणि प्रियांकाच्या नात्याबाबत विचारतो. यावर उत्तर देत निमरीत म्हणते, ‘अंकितच्या मनात अधिक प्लेटोनिक फीलिंग्स आहेत. परंतु प्रियांकामध्ये अंकितपेक्षा जास्त फीलिंग्स आहेत. प्रियांकाला रिलेशनशिप हवंय. परंतु अंकित यासाठी तयार नाहीय’. त्यानंतर साजिद खान प्रतिक्रिया देत म्हणतो, निमरीतने स्वतः च्या डोक्यात स्वतःच एक कथा तयार केली आहे’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या