Breaking News

Bigg Boss 16: सलमान खानने शालिन भनौतला सुनावले खडे बोल; दिला हा सल्ला

मुंबई, 8 ऑक्टोबर-   ‘बिग बॉस’च्या सोळाव्या सीजनचा पहिला आठवडा आता पूर्ण होत आलाय. पहिल्याच आठवड्यात घरात अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यामुळेच सलमान खान ‘वीकेंड का वार’ शनिवारी येण्याऐवजी शुक्रवारीच स्पर्धकांच्या भेटीला आला होता. यामध्ये विशेष म्हणजे सलमान खान स्पर्धकांना भेटण्यासाठी थेट बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला पाहायला मिळालं. सलमानला पाहून घरातील सर्वच स्पर्धक खूप उत्साही आणि आनंदी झाले होते. यावेळी गौरी नागोरी आणि सुंबुल तौकीर यांच्यामध्ये डान्स स्पर्धादेखील घेण्यात आली. कुटुंबातील सदस्यांना गौरी आणि सुंबुल यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं होतं. यामध्ये सुंबुलला टक्कर देत गौरीने बाजी मारली.

बिग बॉसच्या या सीजनमध्ये सतत ट्विस्ट येत आहेत. डान्स स्पर्धेनंतर सलमान खानने कुटुंबीयांसाठी पार्टीची घोषणा केली. परंतु त्यात त्याने पुन्हा एक नवा ट्विस्ट जाहीर केला. या ट्विस्टनुसार पार्टीसाठी फक्त 10 स्पर्धकांची निवड करायची होती. यासाठी सलमानने सर्वप्रथम अब्दू रोजिकला बोलावले. त्यानंतर अब्दूने निम्रित कौरला आमंत्रित केले. अशाप्रकारे एकामागून एक 10 स्पर्धक सलमानसोबत पार्टीत जेवनाचा आस्वाद घेताना दिसून आले. यामध्ये अंकित गुप्ता, प्रियांका चहर चौधरी, श्रीजिता डे, अर्चना गौतम,मान्या सिंग आणि गोरी नागोरी यांना कोणत्याही स्पर्धकाकडून पार्टीचं निमंत्रण मिळालं नाही.
(हे वाचा: Bigg Boss 16: 20 वर्ष लहान सुंबुलसोबत जोडलं जातंय शालिनचं नाव; अभिनेत्याचा आधीच झालाय घटस्फोट)
घरातील स्पर्धक जेवणाचा आनंद घेत असताना सलमान खानने सर्व 10 स्पर्धकांना काही खास टिप्स दिल्या आणि काहीं गोष्टींचा खुलासादेखील केला. यावेळी संवाद साधताना सलमानने शालिन भनौतची शाळा घेत सांगितलं की, मला त्याच्याबाबतचा काही गोंधळ दूर करायचा आहे. सलमान म्हणाला की शालिनला वाटतं की, तो घर चालवत आहे. तो एक चांगला सल्लागार आणि मार्गदर्शक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तोच नव्हे तर त्याच्याकडे सल्ल्यासाठी येणारे लोकही त्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवत आहेत.

दरम्यान सलमान खान एमसी स्टॅनला विचारतो की, त्याच्या नजरेत घरातील बनावट स्पर्धक कोण आहेत? यावर एमसी स्टॅन शालिन भनौत आणि मान्या सिंग यांची नावे घेतो. याबाबत बोलताना तो म्हणाला, मला वाटतं की त्यांचा अभिनय चालू आहे. यावर चिडून शालिननेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. नंतर सलमान खान टीना दत्ताला बनावट स्पर्धकांबद्दल विचारतो. यावर टीनाने श्रीजीता डे आणि शालिन भनौत यांच्यासोबतच घरातील आणखी तिघांची नवे घेतली आहेत.

दरम्यान सुंबुलसोबत एकांतात संवाद साधताना टीना सांगते की, तिला श्रीजित डेकडून अगदी नकारात्मक गोष्टींची जाणीव मिळते. तर दुसरीकडे शालिन भनौतवर विश्वास नाहीय. हे सर्व ऐकून शालिन आणि टीनामध्ये पुन्हा पाहायला मिळतो .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous कुठे गेला सुसंस्कृतपणा? अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यात पुणे प्रथम स्थानी

Check Also

Bigg Boss Marathi 4: गरबा झाला, पैशांचा पाऊसही पडला… कोणाला मिळाला पहिल्या कॅप्टनपदाचा मान?

मुंबई: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये पहिला-वहिला कॅप्टन (Bigg Boss Marathi Season 4 First Captain) …

शहनाज गिलच्या वडिलांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

मुंबई, 8 ऑक्टोबर-  ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचे वडील संतोक सिंग सुख यांना जीवे मारण्याची …