Breaking News

Bigg Boss Marathi 4: गरबा झाला, पैशांचा पाऊसही पडला… कोणाला मिळाला पहिल्या कॅप्टनपदाचा मान?

मुंबई: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये पहिला-वहिला कॅप्टन (Bigg Boss Marathi Season 4 First Captain) घराला मिळाला आहे. बिग बॉस मराठी ४ च्या दसरा स्पेशल एपिसोडपासून कॅप्टनची निवड करायला सुरुवात झाली होती. अवघ्या चार दिवसात या १६ स्पर्धकांनी धुमाकुळ घातला आहे. या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये समृद्धी जाधवने (Samruddhi Jadhav in Bigg Boss Marthi S4) बाजी मारली आहे. या एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे पोहोचला होता. त्याच्या ‘आपडी थापडी’ या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी हो या बिग बॉस ४ च्या सेटवर पोहोचला होता. त्यावेळी त्याने दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला स्पर्धक पहिली कॅप्टन झाली आहे.

हे वाचा-गौरी खानला समुद्रावर शोधण्यासाठी शाहरुख खान दिल्लीहून मुंबई गाठली अन्…

सुरुवातीला या कॅप्टन्सीच्या स्पर्धेत अमृता देशमुख, समृद्धी जाधव आणि तेजस्विनी लोणारी या तिघी या रेसमधील होत्या. मात्र यशश्री मसुरकरने अमृताला या रेसमधून बाहेर काढण्यासाठी एलिमिनेट केले. यानंतर समृद्धी आणि तेजस्विनी यांच्यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क झाला. यामध्ये बाजी मारत समृद्धी पहिली कॅप्टन ठरली आहे.


कॅप्टन्सी कार्यामध्ये पैशांचा पाऊस पडला. या दोघींना योगेशकडून सोने विकत घेण्याचे कार्य होते. योगेश या टास्टचा संचालकही होता. या टास्कमध्ये या दोन्ही स्पर्धकांना त्यांच्या तीन स्पर्धकांच्या साहाय्याने सोन्याची वीट खरेदी करायची होती. सर्व फेऱ्या संपल्यानंतर ज्याच्याकडे सर्वाधिक विटा असतील तो कॅप्टन होणार होता. या सोन्याच्या विटा खरेदी करण्यासाठी त्यांनी BB पॉइंट्स वाचावायचे होते. या टास्कमध्ये समृद्धीने बाजी मारली.


यानंतर समृद्धीच्या इन्स्टाग्राम पेजवरही पोस्ट करण्यात आली आहे. ‘ये रे यरे पैसा, #SassySamruddhi च्या बाजूने लागला फैसला! आपल्या टीमची साथ आणि स्वतःच्या जिद्दीने पहिला captaincy टास्क जिंकून समृद्धी बनलीये बिग बॉस 4 ची पहिली कॅप्टन!’ असे कॅप्शन देत तिच्या इन्स्टा प्रोफाइलवरुन पोस्ट करण्यात आली आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous “नरेंद्र मोदी यांच्यानंतर तुझाच नंबर”; भाजप आमदाराला PFI कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची
Next कुठे गेला सुसंस्कृतपणा? अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यात पुणे प्रथम स्थानी

Check Also

‘तारक मेहता.. मध्ये होणार नाही दयाबेनची वापसी’; शैलेश लोढांची पोस्ट चर्चेत?

मुंबई,8 ऑक्टोबर-  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय विनोदी मालिका आहे. …

प्रवीण तरडेंच्या फेसबुकवरुन पाठवले जातायंत भलतेच मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

मुंबई: सोशल मीडिया, विविध डिजिटल प्लॅटफॉर्म याचा वापर जेवढ्या प्रमाणात वाढला आहे, त्याचबरोबर या माध्यमातून …